वनरक्षक शिर्केला न्यायालयीन कोठडी

वनरक्षक शिर्केला न्यायालयीन कोठडी

वनरक्षक शिर्केला
न्यायालयीन कोठडी
कणकवलीः लाकूड वाहतुकीच्या परवान्याला मुदतवाढ देण्यासाठी लाकूड व्यावसायिकाकडे ३५ हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातर्फे अटक करण्यात आलेला कणकवली येथील वन कार्यालयाचा वनरक्षक नारायण भास्कर शिर्के (वय ४७, रा. कळसुली) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याची एक दिवसाची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी लाकूड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती.
-------------
दोडामार्गात आजपासून
तालुकास्तरीय स्पर्धा
दोडामार्गः कसई-दोडामार्ग येथील पिंपळेश्वर हॉलमध्ये १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता मिशन रेबिज व कसई-दोडामार्ग नगरपंचायत भव्य सोहळा होणार आहे. यानिमित्त दोन दिवस तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले असून १५ ला सकाळी ८ वाजता सिद्धिविनायक गोवेकर कॉलनी बगीच्यामध्ये भिंतीवर चित्र काढण्याची स्पर्धा, नगरपंचायत कार्यालयात वेस्ट टू बंडर (कचरा ते कलाकृती) स्पर्धा, १६ ला सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत पिंपळेश्वर सभागृहात चित्रकला व रांगोळी स्पर्धा होणार आहे. यासाठी ''रेबीज नियंत्रण'' अथवा ''प्राणी कल्याण'' हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धेत इच्छुक असणार्‍यांनी येथील नगरपंचायत कार्यालयात नावे नोंदवावीत. पाळीव व भटक्या श्वानांचे मोफत लसीकरण शिबिर सुरू होणार आहे. शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
-----------------
वैष्णवी आंबेरकरचे
''टॅलेंट सर्च''मध्ये यश
सावंतवाडीः जिल्हा परिषद शाळा नेमळे क्रमांक २ ची दुसरीची विद्यार्थिनी वैष्णवी आंबेरकर हिला युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाले. तिच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप नागवेकर आणि इतर सदस्यांनी तिचे अभिनंदन केले. तिला शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची कासार, वर्गशिक्षक महेश सावंत तसेच अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल वैष्णवीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com