
निमंत्रित सदस्यपदी सुनील कुरूप
- rat14p17.jpgKOP23M02834- सुनील उर्फ राजू कुरूप
जिल्हा नियोजन समितीच्या
निमंत्रित सदस्यपदी सुनील कुरूप
लांजा, ता. १३ ः तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या माजी नगराध्यक्ष व विद्ममान नगरसेवक सुनील कुरूप यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाली.
जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा नियोजनाचा विशेष अनुभव असलेल्या नऊ अभ्यासू सदस्यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली. यात कुरूप यांच्या रूपाने लांजा तालुक्याला संधी मिळाल्याने लांजात उत्साहाचे वातावरण आहे. या समितीचे अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे तर सचिवपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचे वितरण या समितीच्या माध्यमातून केले जाते. समितीवर विधानसभा सदस्य, संसद सदस्य, जिल्हा नियोजनाबद्दल ज्ञान असलेले व विशेष निमंत्रित सदस्य या विविध प्रवर्गातून सदस्य निवड केली जाते. लांजा ग्रामपंचायतीचे सरपंच ते लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व लांजा पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून, लांजातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था न्यु एज्युकेशन सोसायटीचे ते विद्यमान उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत तसेच लांजा तालुका क्रिकेट असोसिएशन, कबड्डी असोसिएशन या संस्थांचेही नेतृत्व भूषवत आहेत. लांजा विकास सोसायटी, मराठा सेवा संघ, लवेबल लांजा, नाना-नानी शांती निवास आदी विविध संस्थांमधून ते विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.