व्यावसायिक अभ्यासक्रमांत करिअर संधी

व्यावसायिक अभ्यासक्रमांत करिअर संधी

व्यावसायिक अभ्यासक्रमांत करिअर संधी
मान्यवरांचे मतः मालवणमध्ये मार्गदर्शन सेमिनार उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : सध्याच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला काय बनायचे आहे, हे स्वतःमधील गुण ओळखून ठरवावे. करियर निवडताना पूर्ण तयारीनीशी व ते पूर्ण करण्याचे ध्येय बाळगूनच निवडावे. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळावे, जेणेकरून त्यातून कला कौशल्य विकसित होऊन नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतील, असे मार्गदर्शन येथे आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनतर्फे आयोजित करियर मार्गदर्शन सेमिनारमध्ये करण्यात आले.
आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन यांच्यातर्फे येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार झाले. यावेळी हॉटेल मॅनेजमेंट व हेल्थ सायन्स या विषयांचे व्यावसायिक उच्च शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी व इतर विद्यार्थी तसेच पालक यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनच्या इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या संचालिका पूर्वा तावडे व आयटीएम आयएचएम अँड आयएचएस मार्केटिंग जनरल मॅनेजर संतोष करंगुटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्यामधील कला कौशल्याला वाव असणारे करियर विद्यार्थ्यांनी निवडले पाहिजे. सामान्य, मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलो तरी आपल्या जीवनात काहीतरी साध्य करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे, असे संतोष करंगुटकर यांनी सांगितले. पूर्वा तावडे यांनी हॉटेल मॅनेजमेंटविषयी मार्गदर्शन करताना आज मालवणमध्ये पर्यटन वाढत आहे. चांगली हॉटेल्स निर्माण होत आहेत; मात्र या हॉटेल्समध्ये दर्जेदार सेवेचा अभाव दिसून येतो. हा अभाव दूर करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट हा एक उत्तम अभ्यासक्रम असून याच्या विविध विभागात विद्यार्थी करियर घडवू शकतात, असे सांगितले. मालवणमधील विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंटकडे करियर म्हणून बघून भविष्यात मालवणात चांगल्या हॉटेल सेवा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सागर जानराव, सिद्धेश कुपटे, सुकेश नगरकर यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com