संभाजी महाराजांचे विचार आदर्शवत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी महाराजांचे विचार आदर्शवत
संभाजी महाराजांचे विचार आदर्शवत

संभाजी महाराजांचे विचार आदर्शवत

sakal_logo
By

swt1411.jpg
02861
मालवणः मानवता विकास परिषदेच्यावतीने येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

संभाजी महाराजांचे विचार आदर्शवत
श्रीकांत सावंतः मालवणात ‘मानवता विकास’तर्फे वंदन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : छत्रपती संभाजीराजे देशाचे आदर्श आहेत. त्यांचे कार्य, कर्तृत्व, युद्धनीती, बुध्दी अफाट होती. आज संभाजी राजेंचा इतिहास, त्यांचे विचार नव्या पिढीला समजावून सांगणे काळाची गरज आहे. संभाजी महाराज खऱ्या अर्थाने धर्मवीर होते आणि ते मराठ्यांचे राजे होते, हे आम्हा सर्वांसाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी येथे केले.
शहरातील भरड येथील हॉटेल लीलांजली येथे धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रामधील एक अग्रगण्य संस्था मानवता विकास परिषदेच्यावतीने साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नायब तहसीलदार आनंद मालवणकर आणि श्रीकांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी धर्मवीर संभाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या घोषणा उपस्थितांमधून देण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते नामदेव मठकर, आनंद मालवणकर, मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत, ज्येष्ठ वकील समीर गवाणकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती सोनवडेकर, संतोष नागवेकर, बिळवस सरपंच मानसी पालव, आशिष खोत, दत्तप्रसाद पेडणेकर आणि मानवता विकास परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ वकील समीर गवाणकर यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास ओघवत्या शैलीत सभागृहात सादर केला. मानवता विकास परिषदेच्या या अनोख्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. श्री. मालवणकर यांनी मानवता विकास परिषदेच्यावतीने आज संभाजी महाराज यांची जयंती मालवणमध्ये साजरी करताना संभाजी राजेंचा इतिहास खऱ्या अर्थाने आज जागवता आल्याचे गौरवोद्गार काढले. यापुढेही आपण सर्वांनी संभाजी राजेंच्या विचारांचे पालन करून मार्गक्रमण करणे जरुरीचे असल्याचे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केला. यावेळी मालवण तालुका विकासात्मक गोष्टींबाबत चर्चा विनिमय झाला.
...............