चिपळूण -महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण -महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यावे
चिपळूण -महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यावे

चिपळूण -महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यावे

sakal_logo
By

भाजपविरोधी पक्षांनी महाराष्ट्रात एकत्र यावे

दलवाई यांचे आवाहन ः राहुल गांधी पूरून उरले
चिपळूण, ता. १४ : कर्नाटकाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा प्रभावी ठरली. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत ही राहुल गांधी यांचा हुकमी एक्का चालणार आहे. त्यामुळे भाजप विरोधी पक्षानी मतभेद विसरावे आणि एकत्र यावे, तरच भाजपला शह देणे शक्य आहे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव इब्राहिम दलवाई यांनी व्यक्त केले.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कर्नाटक विधानसभेचा निकाल म्हणजे देशातील राजकीय परिवर्तनाचा प्रारंभ आहे २०२४ आली केंद्रात देखील परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. भाजप आणि प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकशाही, राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे वारंवार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न झाला. राहुल गांधी यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपने केला पण राहुल गांधी हे भाजपला पूरून उरले. आता महाराष्ट्राच्या जनतेची वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाला जनतेने नाकारले आहे परंतु भाजपाचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यामुळे इतर पक्ष फोडून भाजप सत्ता ताब्यात घेत आहे. कर्नाटक मध्ये मागच्या वेळी सत्ताधारी पक्षातील आमदार भाजपने सोडले या निवडणुकीत ते बंडखोर आमदार आणि मंत्री पुन्हा निवडून आले नाही. महाराष्ट्रामध्येही बंडखोर आमदारांना मतदार जागा दाखवतील. तत्पूर्वी भाजप विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असे श्री दलवाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.