सावंतवाडीत ''कोमसाप''तर्फे संभाजी महाराजांना वंदन

सावंतवाडीत ''कोमसाप''तर्फे संभाजी महाराजांना वंदन

swt1415.jpg
02875
सावंतवाडीः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करताना कवी गझलकार विजय जोशी. यावेळी प्रा. यशोधन गवस, अॅड. संतोष सावंत, दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, प्रतिभा चव्हाण, अॅड. नकुल पार्सेकर आदी.

सावंतवाडीत ‘कोमसाप’तर्फे
संभाजी महाराजांना वंदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य अजरामर राहावे, यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा भरविण्यात येईल. या माध्यमातून शंभुराजेंचा इतिहास जागवला जाईल, असे प्रतिपादन शाखाध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी महाराजांच्या प्रतिमेला देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गझलकार व काव्य प्रशिक्षक विजय जोशी, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, अॅड. नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, मेघना राऊळ, रामदास पारकर आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. पार्सेकर यांनी अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेला सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी, आभार दीपक पटेकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com