योगेश कदम यांच्याकडून काम करण्याची ऊर्जा

योगेश कदम यांच्याकडून काम करण्याची ऊर्जा

३२ ( पान ५)

- rat१४p३०.jpg -
२३M०२८८३
खेड : शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या अस्मिता केंद्रे व समर्थक यांचे स्वागत करताना शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम.

विकासाच्या भूमिकेतून शिवसेनेत

अस्मिता केंद्रे ; पाडापाडीच्या राजकारणाला कंटाळून प्रवेश

खेड, ता. १५ : आमदार योगेश कदम यांच्यासारखे तरुण नेतृत्व लाभल्याने आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळू लागली असून आशेचा किरण निर्माण झाला आहे. मी विकासाच्या भूमिकेतून शिवसेनेत प्रवेश करत आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास असून संघटना जी जबाबदारी देईल ती प्रामाणिक पणे पूर्णत्वास नेऊ व संघटन आणखी बळकट करू, असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता केंद्रे यानी दिला.
काँग्रेसच्या माजी मंडणगड तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता केंद्रे यांनी शनिवारी (ता.१३) खेड तालुक्यातील जामगे येथे शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर त्या बोलत होत्या. खेड तालुक्यातील जामगे येथे शनिवारी अस्मिता केंद्रे यांनी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना नेते रामदास कदम व आ.योगेश कदम यांची भेट घेतली. त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी केंद्रे म्हणाल्या, आम्ही आघाडी म्हणून गेल्या काही वर्षापासून मंडणगड मध्ये काम करत होतो. परंतु आघाडी केवळ नावालाच होती. प्रत्येक निवडणुकीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाडापाडीच्या राजकारणाचा सामना करावा लागत होता. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास असून संघटना जी जबाबदारी देईल ती प्रामाणिक पणे पूर्णत्वास नेऊ व संघटन आणखी बळकट करू. यावेळी शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, अनंत केंद्रे, विभाग प्रमुख संजय शेडगे, उप तालुका प्रमुख हरिश्चंद्र कोदेरे, महिला तालुका संघटक अमिता शिंदे, इरफान बुरोंडकर, बदृद्दिन उंडरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com