खेडमेध्ये मोफत उपचार शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडमेध्ये मोफत उपचार शिबिर
खेडमेध्ये मोफत उपचार शिबिर

खेडमेध्ये मोफत उपचार शिबिर

sakal_logo
By

३१ (पान ५ साठी, संक्षिप्त)

खेडमध्ये मोफत सांधेदुखी उपचार शिबीर

खेड : येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवा केंद्रातर्फे १८ ते २१ मे या कालावधीत मोफत सांधेदुखी रोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन खेड येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या लाईट हाऊस इमारतीमध्ये करण्यात आले आहे. बडोदा येथील डॉ. राजू व डॉ. श्याम हे तज्ञ १९ ते २१ या कालावधीत दररोज सकाळी ९ ते १० व सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत रुग्णांना विना औषधी सांधे आजार कसे बरे करता येतात याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात मर्यादित संख्येत लोकांना सहभागी होता येणार असल्याने सेवा केंद्रात १८ पूर्वी शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदवणे गरजेचे आहे, अशी माहिती ब्रह्मकुमारी गीता यांनी दिली.
-----

- rat१४p३३.jpg-
२३M०२८८८
सर्वम शिरोडकर

समर्थ कृपा इंग्लिश मिडियमचा निकाल १०० टक्के

खेड : श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम (सी.बी.एस.ई.) स्कूल वेरळ, इयत्ता दहावीच्या २०२२-२३ च्या बॅचचा १०० टक्के निकाल लागला. निकालाची ही परंपरा कायम राखली. या परीक्षेला १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक सर्वम हर्षल शिरोडकर ८८.६ टक्के, द्वितीय क्रमांक वैष्णवी राम घोसाळकर ८७.४ टक्के, तृतीय क्रमांक सानिका सुभाष जाधव ८३.२ टक्के गुण मिळवले. मराठी विषयात दोन विद्यार्थ्यांनी वैष्णवी राम घोसाळकर व तेजस महेश वायकर यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील सार्थक शैलेश पराडकर ८९.८ टक्के, श्रावणी अण्णा चौगुले ८६.६ टक्के, निल रुदिल जंगले ८५ टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले. तसेच वाणिज्य शाखेतील हर्ष संजय कालेकर याने ७२ टक्के गुण मिळविले. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय शेटवे, सचिव डॉ. संजना पाष्टे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉ. एस. एस. अली तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
-----
- rat१४p३५.jpg-
२३M०२८९७
रुद्रांश समीर शेठ

आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत रूद्रांश शेठचे यश

खेड : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वसंत ऋतू चॅम्पियशिप बुद्धिबळ स्पर्धेत मध्ये रुद्रांश समीर शेठ याने २२० स्पर्धकांमध्ये यश मिळवले आहे. खेड शहरातील शेठ कुटुंबातील समीर व गार्गी हे दाम्पत्य अमेरिकेत नोकरी निमित्त स्थायिक वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा रुद्रांश समीर शेठ एव्हेण्युस द वल्ड स्कूल अमेरिकेत शिक्षण घेत असून वसंत ऋतू आगमन होताच तेथील न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टिकट या शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यासाठी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आपल्या कौशल्याची चुणूक रुद्रांश याने दाखवत यश मिळवले आहे. या यशाबद्दल खेड येथील त्याचे आजोबा प्रकाश शेठ, नातेवाईक, कुटुंबीय, मित्र यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रुद्रांश याला या स्पर्धेतील यशाबद्दल सन्मान चषक देऊन गौरविण्यात आले आहे.
-----

- rat१४p३६.jpg-

२३M०२८९८
लेफ्टनंट जनरल कुलभूषण गवस यांनी नुकतीच तिसंगी गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लेफ्टनंट जनरल गवस यांची तिसंगीला भेट

खेड : तालुक्यातील कुंभाड़ गावचे सुपुत्र कर्नल अशोकराव भोसले यांचे व्याही लेफ्टनंट जनरल कुलभूषण गवस यांनी नुकतीच तिसंगी गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिसंगी शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्राम मंदिरात केदार काळकाई देवीचे त्यांनी दर्शन घेतले. तसेच नवानगर येथील वीर स्तंभाला मानवंदना दिली. यावेळी सैनिक भवनला भेट दिली. सत्काराला उत्तर देताना सांगितले की, तरुण तरुणींनी सैन्यातील अग्निवीर योजनेचा लाभ घ्यावा. मुलीनी सैन्यात भरती व्हावे. ग्रामस्थांचे सत्कार केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भोसले गुरुजींनी केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते लेफ्टनंट जनरल गवस यांना तिसंगी गावात गावचे सुपुत्र कॅप्टन गुलाबराव भोसले यांनी आणले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरसिंग भोसले, राजेंद्र भोसले कॅप्टन अनंतराव भोसले विष्णु पंत भोसले,दिलीप भोसले सर्व माजी सैनिक यांनी मेहनत घेतली.