अध्यक्षपदी अॅड.वासुदेव तुळसणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी अॅड.वासुदेव  तुळसणकर
अध्यक्षपदी अॅड.वासुदेव तुळसणकर

अध्यक्षपदी अॅड.वासुदेव तुळसणकर

sakal_logo
By

ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या
अध्यक्षपदी अॅड.वासुदेव तुळसणकर
राजापूर,ता. १४ ः ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या शुकवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन २०२३ ते २०२८ साठी संस्थेची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून संस्थेच्या अध्यक्षपदी अॅड.वासुदेव शंकर तुळसणकर यांची निवड करण्यात आली आहे.
ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यात नवीन संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष तुळसणकर, कार्याध्यक्ष प्रदीप धोंडू संसारे, उपाध्यक्ष अरविंद दत्ताराम गोसावी, कार्यवाह गणपत सदाशिव जानस्कर, सहकार्यवाह सूर्यकांत विष्णु सुतार, खजिनदार संतोष वडवलकर यांची तर सदस्य म्हणून सूर्यकांत तुळसणकर, गणपत भारती, संजय सावंत, विजयकुमार वागळे, अशोक ब्रीद, महादेव धुरे, अनंत नागम, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, अॅड. एकनाथ मोंडे, अॅड.गुरुदत्त खानविलकर, रामचंद्र जानस्कर यांची निवड करण्यात आली आहे.
तुळसणकर यांनी १९९१ पासून आजपर्यंत सलग ३३ वर्षे अध्यक्ष म्हणून काम करत असताना संस्थेची शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा व एकांकिका स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी व समाज प्रबोधनासाठी स्पर्धा घेतल्या जातात. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सानेगुरुजी कथाकथन स्पर्धा व आई आधारकेंद्राच्या माध्यमातून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात.