बागेश्रीचे वास्तव्य केरळजवळ खोल समुद्रात

बागेश्रीचे वास्तव्य केरळजवळ खोल समुद्रात

- rat१४p३१.jpg- KOP२३M०२८८४
ऑलिव्ह रिडले कासवांचे ठिकाण दर्शवणारा नकाशा


‘बागेश्री’चे वास्तव्य केरळजवळ खोल समुद्रात
पावसाळ्यातील वास्तव्याकडे लक्ष ः प्रवाहानूसार प्रवास
रत्नागिरी, ता. १४ ः गुहागर येथील किनार्‍यावरुन टॅगिंग करुन सोडलेली दोन कासवे दक्षिणेकडील समुद्र किनारी भागात आहेत. त्यातील बागेश्री हे कासव गुहापेक्षा पुढे गेले असून सध्या ते केरळ किनाऱ्‍यांपासून १०० किलोमीटर खोल समुद्रात आहे. पावसाळ्यामध्ये ते पुन्हा कारवार परिसरात येणार का ? याकडे संशोधकांचे लक्ष आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील कासवांचे शेवटचे ठिकाण मंगळूरचा किनारा होते. या परिसरात आवश्यक खाद्य मिळत असल्याने ऑलिव्ह रिडले कासवाचा रहिवास पावसाळ्यामध्ये येथे असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. यावर्षी त्याला दुजोरा मिळणार आहे. सध्या दोनपैकी एक कासव याच परिसरात निवास करुन आहे. दुसरे कासवही येथेच येऊन पावसाळ्यात मुक्काम करणार का? याची निरीक्षणे नोंदवण्यासाठी अभ्यासक उत्सुक आहेत. गतवर्षी पहिल्या टप्प्यात समुद्रात सोडण्यात आलेल्या पाच ऑलिव्ह रिडले कासंवाचा अधिवास शोधण्यात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. जुन महिन्यात शेवटच्या कासवांचा संपर्क तुटला. ते कासव कारवारच्या दरम्यान होते. ट्रान्समीटरमध्ये झालेल्या बिघाडामुळे वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानतर्फे यंदा दुसर्‍या टप्प्यात दोन कासवांना टॅगिंग करुन समुुद्रात सोडले. दोन्ही कासवे सुरवातीला उत्तरेकडे गेली. कालांतराने ती पुन्हा दक्षिणेकडे प्रवास करु लागली. बागेश्री कासव केरळच्या मेंगलोरपर्यंत येऊन थांबले आहे. गुहा कासव कारवार किनाऱ्यापासून खोल समुद्रात आहे. बागेश्री पून्हा माघारी फिरून कारवारपर्यंत येणार कि मेंगलोरमध्येच राहणार यावर अभ्यासकांनी लक्ष ठेवले आहे. पावसाळ्यात प्रवाहानूसार कासवांचा प्रवास सुरू असतो.

---
कोट
ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रवासाची माहिती ट्रान्समीटरमुळे प्रत्येक दिवशी मिळत आहे. त्याच्या नोंदी संकलित केल्या जात असून त्यावरुन योग्य तो निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
- सुरेश कुमार, अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com