-रत्नागिरी ः क्राईम

-रत्नागिरी ः क्राईम

फ्लॅट आवडला सांगून ८० हजारांची फसवणूक
रत्नागिरीः तुमचा फ्लॅट आवडला असून भाड्याने घेण्यास तयार आहे,असे सांगून डिपॉझीट भरण्याकरिता क्युआरकोड पाठवून फिर्यादीची सुमारे ८० हजाराची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक पवार (रा. दिल्ली पुर्ण पत्ता माहिती नाही) असा संशयित आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी पावणेपाच ते पाच यावेळात स्वप्न साफल्य जागुष्टे कॉलनी-कुवारबाव येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी ओएलएक्सवर फ्लॅट भाड्याने देण्यासंदर्भात जाहिरात दिली होती. ती जाहिरात बघून संशयित दीपक पवार याने फोन करुन तुमचा फ्लॅट आवडला असून भाड्याने घेण्यास इच्छूक आहे, असे सांगितले. १६ हजार डिपॅाझिट भरण्याकरिता क्युआरकोड पाठवतो, असे सागुन सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास गुगल पे नंबरवर स्कॅन करा असे सांगून बॅंक अकाऊंट नंबर मधून अनुक्रमे १६ हजार, १६ हजार, ४८ हजार असा ८० हजार रुपये संशयित दीपक पवार यांने काढले. या प्रकरणी फसवणूक झालेल्याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी दारु विक्रीबद्दल गुन्हा
पावस ः येथील पावस-खारवीवाडा येथे घराच्या समोर मोकळ्या जागेत विनापरवाना हातभट्टीची गावठी दारु बाळगणाऱ्या संशयित महिलेविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वासंती गणपत पावसकर, असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) दुपारी दीडच्या सुमारास खारवीवाड येथील एका घराच्या समोर मोकळ्या जागेत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिलेकडे ३३५ रुपयांची पाच लिटर गावठी हातभट्टीची दारु सापडली. या प्रकरणी पोलिसांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.


मिरजोळे येथे दारु अड्यावर छापा
रत्नागिरी ः शहरानजीक मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारु अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी १८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयप्रकाश अनंत जाधव (वय ४०, रा. मिरजोळे-बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. सकाळी पावणेनऊच्या सुमारास मिरजोळे येथेल नदिकिनारी असेलेल्या झाडीझुडपाच्या भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरजोळे पाटीलवाडी- नदीकिनारी झाडीझुडपाच्या भागात गावठी हातभट्टीची दारु अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी शनिवारी सकाळी धाड टाकली या धाडीत १८ हजार ७०० रुपयांचा गुळ, नवसागर मिश्रीत कुजके रसायन तसेच साहित्य असा १८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल संशयिताने स्वतः जवळ दारु पाडण्याच्या उद्देशने साहित्य जवळ बाळगल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
----------
नांदिवडे येथे दारु विक्रीवर कारवाई

रत्नागिरी ः तालुक्यातील नांदिवडे-घोगलवाडी येथील जंगलमय भागात दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सुरेश गुरव असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास नांदिवडे-घोगलवाडी येथील जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित ७७५ रुपयांची १५ लिटर दारू विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.
-------
पाली-बौद्धवाडी येथील प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील पाली-बौद्धवाडी येथील प्रौढाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. बाबाराम रामा सावंत (वय ५७, रा. बौद्धवाडी पाली, रत्नागिरी ) मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय पाली येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबाराम सावंत यांना दारुचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यावर दोन दिवसापुर्वे सरकारी दवाखाना पाली येथे उपचार केले होते. परंतु पोटाचे दुखत असल्याने त्या नैराश्यापोटी शनिवारी विहिरीच्या पाण्यात उडी मारली. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ काढून उपचारासाठी दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
---------

- rat१४p२९.jpg- KOP२३M०२८८२ राजापूर : अपघातग्रस्त गाडी

अणुस्कुरा घाटात चार चाकीला अपघात
राजापूर : कोल्हापूरहून पाचलच्या दिशेने येणाऱ्या कारला ( एमएच ०१, व्हीए २८६०) गाडीचा दुपारी २ वा. च्या सुमारास अणुस्कुरा घाटात अपघात झाला. ती गाडी रस्त्याच्या बाजूला कलंडली. या गाडीत आई, वडील व मुलगी असे कुटुंब होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. गाडीचे मात्र थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अणुस्कुरा घाटाचे कामं नुकतेच पूर्ण झाल्याने रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात ग्रीटभुसा आहे. त्यावरून गाडी घसरून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आधी देखील घाटात अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com