
अमली पदार्थविरोधी कारवाईच आणखी 4 गजाआड
पान १ साठी
आणखी चौघांना केले गजाआड
अमली पदार्थ तस्करी; हेरॉईन, गांजाचा साठा जप्त, २ पथकांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः अमली पदार्थाची तस्करी व सेवन करणाऱ्या पाच जणांना गुन्हे प्रकटीकरण पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. रेल्वे स्टेशन येथे तस्करी करणाऱ्या चौघांकडे २१.७८ ग्रॅम हेरॉईन सापडला तर पारस नगर येथे अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांकडे १५.७२ ग्रॅम गांजा सापडला. ग्रामीण व शहरी पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध अमलीपदार्थ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदीप गोविंद शिवगण (धनजीनाका रत्नागिरी), आकीब खालीद काझी (गवळीवाडा रत्नागिरी) व तौसिफ आसिफ मिरजकर (राहुल कॉलनी गवळीवाडा, रत्नागिरी) अशी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. अनिल मान बहादूर गुरूंग (२३, रा. कारवांनचीवाडी व मूळ ः पोलमाणपूर बाजारपेठ, जिल्हा कैलाली, नेपाळ) असे पारस नगर येथे गांजा सेवन करण्याऱ्याचे नाव आहे. तस्करी विरुद्ध रविवारी (ता. १४) दुपारी दोन वाजता पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी (ता. १३) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्यावर कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात अमली पदार्थविरोधी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांनी दिल्या होत्या त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी, अमलदार यांना सूचना दिल्या होत्या. गोपनीय माहिती घेण्याचे काम सुरू होते. रविवारी दुपारी पोलिस प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अमलदार रेल्वे स्टेशन येथील पार्सल गेटमधून पार्किंगकडे जाणाऱ्या रोडवर पायी पेट्रोलिंग करत जात असताना तिघे संशयित संदीप, आकीब व तौसीप हे एकत्रित संशयास्पद हालचाली करत असताना आढळले त्यांना जागीच थांबवून पंचाचे समक्ष चौकशी केली व अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे २१.७८ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ विक्री करत असताना सापडले, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा व पथकामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस पथकाने ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पारस नगर-खेडशी तलाठी कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत संशयित नेपाळी अनिल गुरुंग हा संशयित हालचाली करत असताना सापडला त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १५.७२ ग्रॅम अमली पदार्थसदृश गांजाची एक पुडी व इतर साहित्य सापडले. ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातर्फे करण्यात आलेल्या कारवाई संशयिताविरुद्ध अमली पदार्थ तस्करी केल्या प्रकरणी संशयित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.