
दोडामार्ग येथील वृद्धाचा तिलारी कालव्यात मृतदेह
swt1418.jpg
02905
दोडामार्गः घटनास्थळी ग्रामस्थांनी केलेली गर्दी. (छायाचित्रः संदेश देसाई)
दोडामार्ग येथील वृद्धाचा
तिलारी कालव्यात मृतदेह
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १४ : शहरातील वरची धाटवाडी येथील सुरेश केशव गवस (वय ७३, मूळ रा. पिकुळे) यांचा मृतदेह शहरातून गोव्याच्या दिशेने गेलेल्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आज सकाळी आढळून आला. गवस हे अलीकडेच दोडामार्गात स्थिरावले होते. आज सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ते कालव्यातील पाण्यात मृतावस्थेत आढळून आले. याबाबत नगराध्यक्ष चेतन चव्हाण येथील पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. गवस यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याबाबत दोडामार्ग पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, तिलारी प्रकल्पाच्या या कालव्यानजीकची कामे अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे कालवा मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी तरी ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी केली.