दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताला जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताला जामीन
दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताला जामीन

दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताला जामीन

sakal_logo
By

पान ३


दुचाकी चोरी प्रकरण;
संशयिताला जामीन
चिपळूण : शहरातील दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून चिपळूण पोलिसांनी काही तासात अटक केलेल्या अजय कृष्णा कदम याला चिपळूण न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करत त्याची सुटका केली आहे.
चिपळूण शहरातील खेंड येथील समीर रामकृष्ण चिखले यांची दुचाकी रविवारी दुपारी चोरीस गेली होती.या बाबत त्यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.दरम्यान चिपळूणचे पोलीस सायंकाळी शहरातील पाग परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक तरुण दुचाकी चालवत असल्याचे व पोलिसांना बघून तो काहीसा गोधंळल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी त्याला विचारणा केली असता तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला.तसेच चोरीस गेलेल्या दुचाकीच्या नंबरची खात्री करता ही तीच दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ अजय कृष्णा कदम याला अटक करून गुन्हा दाखल केला होता. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा पोलिसांनी एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने ग्राहय धरत पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली आणि न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. न्यायालयाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करत अजय कदम याची मुक्तता केली. मात्र ठाण्यात वेळोवेळी हजर राहून तपास कामात पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देशदेखील या वेळी न्यायमूर्ती पी. आर. कुलकर्णी यांनी दिले आहेत.