चौकुळ मुख्य रस्त्याचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकुळ मुख्य रस्त्याचे काम रखडले
चौकुळ मुख्य रस्त्याचे काम रखडले

चौकुळ मुख्य रस्त्याचे काम रखडले

sakal_logo
By

चौकुळ मुख्य रस्त्याचे काम रखडले

ग्रामस्थांची खंत; पावसाळ्यापूर्वी न झाल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. १५ : चौकुळ मुख्य रस्त्याचे काम ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष यामुळे रखडल्याचा आरोप करत पावसाळ्यापूर्वी दर्जेदार रस्ता न मिळाल्यास अधिकाऱ्यांना घेराओ घालण्यात येईल. तसेच मंत्रालयीन पातळीवर याचा जाब विचारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
चौकुळ येथील रस्त्यासाठी पावणे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम महिन्यापूर्वी ठेकेदाराने सुरू केले; मात्र डांबर न घालता रस्त्यावर मोठी खडी पसरून काम उरकून घेत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ते बंद पाडले होते. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी पाहणी करून ठेकेदारास धारेवर धरत नवीन रस्ता उखडून पुन्हा रस्ता करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या; मात्र ठेकेदाराने अद्यापपर्यंत तो रस्ता काढलेला नाही. शिवाय उर्वरित रस्त्याचेकाम बाजूपट्टी मातीची घालून उरकले आहे. रस्त्यात खडीचे ढीग मांडले असून यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या निधीची लूटमार करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला वारंवार कामे दिली जात असून बोगस कामे करूनही संबंधित ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी काळ्या यादीत टाकले नसल्याचा आरोपही चौकुळवासीयांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकाराची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे दर्जेदार काम न झाल्यास अधिकाऱ्यांना घेरावो घालून याबाबत मंत्रालय पातळीवर जाब विचारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.