तांबुळीत संरक्षक भिंतीचे काम सुरू

तांबुळीत संरक्षक भिंतीचे काम सुरू

तांबुळीत संरक्षक भिंतीचे काम सुरू
सावंतवाडी ः तांबुळी-असनिये मुख्य मार्गादरम्यान दरीच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या संरक्षक भिंतीचे काम अखेर हाती घेण्यात आल्याने वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तांबुळी-असनिये हा मुख्य रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. मुळात हा रस्ता अरुंद आहे. त्यात तांबुळी गाबातील दरीच्या ठिकाणी संरक्षक भिंत नसल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरला होता. संरक्षक भिंतीअभावी वाहने थेट दरीत जाऊन लगतच्या बागायतीत कोसळण्याची भीती होती. याबाबत बांधकाम विभागाचे अनेकवेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी होती. अखेर अनेक वर्षानंतर या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
---------------
भालावल, विलवडेत साकवाचे काम
सावंतवाडी ः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विलवडे आणि भालावल या दोन्ही गावांच्या धनगरवाड्यांचा साकवाचा प्रश्न मार्गी लागला असून या कामाचा नुकताच प्रारंभ झाला. यासाठी २१ लाख ८१ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे यांनी याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष प्रश्न वेधल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. यावेळी गावडे यांच्यासह विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, भालावल सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, विलवडे गावचे मानकरी बाबुराव दळवी, भालावल पोलिसपाटील परब, संतोष दळवी, राजन लांबर, धोंडू कोकरे, विनायक सावंत, प्रमोद दळवी, सुरेश सावंत आदी उपस्थित होते.
---
कणकवली येथे छत्रपती शंभुराजेंना वंदन
कणकवली ः अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्गच्यावतीने येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष एस. टी. सावंत यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष लवू वारंग, सरचिटणीस एस. एल. सपकाळ, कणकवली तालुकाध्यक्ष सुशील सावंत, जिल्हा संघटक अनुप वारंग, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नीळकंठ वारंग, दिग्विजय राणे, सागर वारंग, भगवान लोके, श्री. साटम आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते.
---------------
सातार्ड्यात आज ‘शेषात्मज गणेश’
सावंतवाडी ः सातार्डा-केरकरवाडी येथील इस्वटी देवाचा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. १६) होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहाला अभिषेक, श्रींची महापूजा होणार आहे. दुपारी महाप्रसाद, सायंकाळी पाचला भजन व सायंकाळी साडेसातला दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘शेषात्मज गणेश’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केरकरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
--
बिस्किटांचे मखर कोंडुरेत लक्षवेधी
सावंतवाडी ः कोंडुरा वरचीवाडी (ता.सावंतवाडी) येथील प्रसिद्ध श्री राष्ट्रोळी देवस्थान येथे नुकतेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त श्रींची महापूजा व इतर कार्यक्रम झाले. दरवर्षीप्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते या पूजेनिमित्त नावीन्यपूर्ण मखर बांधत असतात. यावर्षी झालेल्या पूजेनिमित्त मंडळाचे कार्यकर्ते अंगार मुळीक व त्याच्या सहकाऱ्यांनी खाण्याच्या बिस्किटांचा वापर करून तयार केलेले मखर लक्षवेधी ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com