पावसमध्ये विकास योजनांसाठी मदत करणार

पावसमध्ये विकास योजनांसाठी मदत करणार

१७ (पान २ साठीमेन)

-rat१५p१४.jpg-
२३M०२९९८
पावस ः स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या पावस शाखेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करताना अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन. सोबत मिताली भाटकर आणि संचालक.
rat१५p१५.jpg-
२३M०२९९९
पावस ः बोलताना अॅड. दीपक पटवर्धन. सोबत माधव गोगटे, विजय देसाई, मिताली भाटकर आदी.
----
पावसमधील विकास योजनेस मदत करणार

अॅड. पटवर्धन ; स्वामी स्वरूपानंद पतसंस्था स्ववास्तूत

रत्नागिरी, ता. १५ ः आपले आचरण, विचार चांगले असतील तर स्वामी स्वरूपानंदांसारख्या थोर विभूतींचा आशीर्वाद मिळतो. स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे. पतसंस्थेचे ९ हजार ग्राहक असून २१ कोटी ८८ लाखांची कर्जे आहेत. कर्जवसुली १०० टक्के आहे. गेली १९ वर्षे पतसंस्था पावस दशक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध असून यापुढेही ग्राहकांच्या नवनव्या विकास योजनांसाठी सहकार्य करेल, असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
पतसंस्थेची पावस शाखा नव्या वास्तूमध्ये स्थलांतरित झाली. या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी अॅड. पटवर्धन बोलत होते. ते म्हणाले, रितसर परवानगी घेऊन ८ दिवसांत शाखा सुरू करण्यात आली. आज ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर २ हजार चौरस फुटाच्या मोक्याच्या जागेत स्थलांतर केले आहे. ग्राहकांचा वेळ वाचला पाहिजे म्हणून तत्पर, अचूक, विश्वासार्ह सेवा दिली जाते.
या प्रसंगी उपाध्यक्ष माधव गोगटे, गोळपच्या सरपंच मिताली भाटकर, उद्योजक विजय देसाई, पतसंस्थेचे संचालक अजित रानडे, जयप्रकाश पाखरे, शरदचंद्र लेले, प्रसाद जोशी, राजू सावंत आदी उपस्थित होते. पतसंस्थेसाठी जागा देणारे अक्रम नाखवा, इंटेरियर डिझायनर प्रशांत माचकर, गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकर, करिम सावकार, हनिफ मुल्ला, रमण दळी, जयंत फडके, लाईक फोंडू, फकिर पांढरे, मजिद काझी, इम्रान हाजू, जुनेद फोंडू, नाना पावसकर, प्रशांत फडके, सुधाकर गुरव, संतोष सुर्वे, रणजित सुर्वे, अमोल पाथरे, पावसचे उपसरपंच प्रवीण उर्फ बाय शिंदे, विजय देसाई, विक्रांत रांगणकर, मनोहर लेले, कांचनकुमार काळे, रघुनाथसिंह चुंडावत, मंगेश भोजने, अरविंद पवार, प्रकाश पवार, समीर हातोडकर, बाबाशेठ साळवी यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन व्यवस्थापक मोहन बापट यांनी केले. उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, पावस शाखा व्यवस्थापक विशाल सावंत व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
--
प्रक्रिया उद्योगासाठी सहकार्य करा
प्रगतशील शेतकरी जयंत फडके यांनी पावस दशक्रोशीत आंबा, फणस, काजू, नारळ, कोकम यांवर प्रक्रिया उद्योग सुरू होण्याकरिता पतसंस्थेने मदत करण्याचे आवाहन केले. रमण दळी यांनी प्रामाणिकपणा, तत्पर व उत्तम सेवा देणारे कर्मचारी यांच्यामुळे ग्राहक समाधानी असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com