गोगटे महाविद्यालयाच्या निसर्ग परिचय शिबिरास प्रतिसाद

गोगटे महाविद्यालयाच्या निसर्ग परिचय शिबिरास प्रतिसाद

१८ (पान २ साठी)

-rat१५p६.jpg-
२३M०३०५१
रत्नागिरी ः निसर्ग परिचय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. सोनाली कदम. सोबत प्रा. शरद आपटे, डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. अपर्णा कुलकर्णी.
----------

निसर्ग संवर्धनाची जबाबदारी युवकांवर

वनक्षेत्रपाल प्रकाश पाटील; निसर्ग परिचय शिबिरास प्रतिसाद

रत्नागिरी, ता. १५ ः निसर्ग वाचवणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. त्यावर भविष्यातील वाटचाल अवलंबून असेल, असे प्रतिपादन लांज्याचे वनक्षेत्रपाल प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे दोन दिवसाचे अनिवासी निसर्ग परिचय शिबिराच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. खानू येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान आणि सामाजिक वनीकरण विभाग रोपवाटिका येथे हा कार्यक्रम झाला.
रत्नागिरी, चिपळूण, गुहागर तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी या शिबिरात भाग घेतला. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते आणि विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा प्रारंभ झाला.
वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. शरद आपटे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. शालेय शिक्षणाबरोबरच निसर्ग परिचय करून घेणे किती आवश्यक आहे हे सांगताना निसर्ग म्हणजे काय ही संकल्पना विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. शरद आपटे यांनी स्पष्ट केली. डॉ. सोनाली कदम यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन करताना वयाचे बंधन नसते, असे विविध निसर्ग संवर्धकांची उदाहरणे देत सांगितले.
विद्यार्थ्यांना निसर्ग परिचय करून देण्याच्यादृष्टीने निरनिराळ्या निसर्गाविषयक खेळांचे आयोजन करण्यात आले. डॉ. मधुरा मुकादम यांनी वैशिष्ट्यपूर्ण प्राणी या व्याख्यानादरम्यान विशिष्ट प्राण्यांबद्दल चलचित्रे विद्यार्थ्यांना दाखवली. शिबिरासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. ऋजुता गोडबोले, प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे आणि प्रा. परेश गुरव यांनी विशेष प्रयत्न केले.
--
कोकणात देवराई
प्रत्यक्ष अनभवातून निसर्ग परिचय करून देण्यासाठी शिबिरार्थींसाठी खानू येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान आणि सामाजिक वनीकरण विभाग रोपवाटिका येथे निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले. निसर्ग संवर्धन करण्यासाठी कोकणात जपली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण अशा देवराई परंपरेबद्दल प्रा. शरद आपटे यांनी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com