Mon, Sept 25, 2023

लाच प्रकरणी संशयिताला कोठडी
लाच प्रकरणी संशयिताला कोठडी
Published on : 15 May 2023, 1:47 am
लाच प्रकरणी संशयिताला कोठडी
कणकवली ः जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कणकवली वन परिक्षेत्र कार्यालयात छापा टाकून वनरक्षक नारायण भास्कर शिर्के (वय ५०, रा. कळसुली) याला ताब्यात घेतले होते. संशयिताला न्यायालयात उभे केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. तक्रारदार यांच्याकडे लाकूड वाहतूक करण्यासाठी ४० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी शिर्केंवर कारवाई झाली. तपास पूर्ण झाल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता शिर्के यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.