चिपळूण-रिक्टोलीतील नालंदा बौद्धविहाराचे सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-रिक्टोलीतील नालंदा बौद्धविहाराचे सुशोभीकरण
चिपळूण-रिक्टोलीतील नालंदा बौद्धविहाराचे सुशोभीकरण

चिपळूण-रिक्टोलीतील नालंदा बौद्धविहाराचे सुशोभीकरण

sakal_logo
By

- ratchl156.jpg ः KOP23M03030 चिपळूण ः रिक्टोली येथे साकरलेले नालंदा बौद्धविहार.
-------------------
नालंदा बौद्धविहाराचे
रिक्टोलीतील सुशोभीकरण
चिपळूण, ता. ५ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर परिश्रम घेऊन भारताची राज्यघटना व भारतीय लोकशाही आपल्याला दिली आहे. त्यांच्या या कठोर मेहनतीमुळेच भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ ठरले. या संविधानामुळेच देशाची एकता व अखंडता कायम असून लोकशाही व्यवस्था अबाधित आहे. याचे सारे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना द्यावे लागेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.
तालुक्यातील रिक्टोली बौद्धजन मंडळ व चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, गावशाखा रिक्टोली यांच्यावतीने नालंदा बुद्ध विहाराच्या सुशोभीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत् भगवान गौतम बुद्ध या महामानवांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भालचंद्र जाधव, स्वागताध्यक्ष स्थानिक रमेश जाधव, दीपक जाधव, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, आपल्या मंडळाने खूप परिश्रम करून नालंदा बुद्ध विहाराचे नुतनीकरण व सुशोभीकरण केले आहे. ही वास्तू अत्यंत देखणी व मनमोहक बनली आहे. माजी बांधकाम सभापती विनोद झगडे यांनी माझ्या जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांमध्ये आपण पक्षनिरपेक्ष वृत्तीने काम केले याचे समाधान असल्याचे सांगितले. सकाळी धम्म ध्वजारोहण मधुकर जाधव, पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व शहीद शशांक शिंदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर धम्मपूजा पाठ बौद्धाचार्य जयरत्न कदम गुरूजी यांच्या हस्ते तसेच धम्म प्रवचन मार्शल अनिकेत उबाळे यांनी केले.