राजापूर-रायपाटणमधील अर्जुना नदीतील गाळ उपसा

राजापूर-रायपाटणमधील अर्जुना नदीतील गाळ उपसा

फोटो ओळी
-rat१५p१८.jpg ःKOP२३M०३०४७ राजापूर ः गांगणवाडी परिसरात अर्जुना नदीतील गाळ उपशाचे सुरू असलेले काम.


रायपाटणमधील अर्जुना नदीतील गाळ उपसा

वेगाने काम सुरु ः पूर समस्येतून मिळणार दिलासा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः तालुक्यातील रायपाटण गांगणवाडी परिसरामध्ये अर्जुना नदीपात्रातील साचलेला गाळ शासनातर्फे काढला जात असून त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून वेगाने सुरू आहे. या उपशामुळे गांगणवाडीमध्ये भरणार्‍या पुराच्या पाण्याचा धोका कमी होऊन गांगणवाडी परिसराची पूर समस्येतून काहीशी सुटका होणार आहे.
दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमध्ये अर्जुना नदीला महापूर येऊन शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पुराचे पाणी घुसले होते. त्यामध्ये रायपाटण येथील गांगणवाडीचाही समावेश होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेकांच्या घरामध्ये अचानक घुसलेल्या पाण्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर सातत्याने नदीपात्रातील गाळाचा उपसा व्हावा, अशी मागणी लोकांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन शासनाकडून गाळ उपशाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शासनाकडून उपसा झाला नव्हता. त्यानंतर, माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिलेल्या मशिनरीच्या साहाय्याने नदीपात्रातील गाळ उपसा झाला होता. त्यामुळे त्यानंतरच्या पावसाळ्यामध्ये लोकांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यावर्षी पूरस्थितीचा फटका गांगणवाडीवासियांना बसलेला नव्हता. मात्र, भविष्यामध्ये या वाडीमध्ये पुराचे पाणी घुसणार नाही अशीही स्थिती नाही. त्यामुळे नदीपात्रातील गाळ उपसा व्हावा यासाठी येथील ग्रामस्थांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. शासनाकडून रायपाटण गांगणवाडीतील अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि कामाला सुरवा झाली आहे.
अर्जुना नदीच्या तीरावर रायपाटण गांगणवाडी वसलेली असून एका बाजूला अर्जुना नदी तर दुसर्‍या बाजुने येणारा वहाळ अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्या वाडीतील ग्रामस्थांना दुहेरी पुराचा फटका सहन करावा लागतो. अशा वेळी मागील बाजूला असलेल्या डोंगराळ भागाचा ग्रामस्थांना आधार घ्यावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com