ओसरगाव तलावासाठी ७० लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओसरगाव तलावासाठी ७० लाख
ओसरगाव तलावासाठी ७० लाख

ओसरगाव तलावासाठी ७० लाख

sakal_logo
By

03057
ओसरगाव : येथील तलाव गळती प्रतिबंधक कामाचा प्रारंभ आमदार नीतेश राणे यांनी आज केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी.


ओसरगाव तलावासाठी ७० लाख

आमदार नीतेश राणे; गळती प्रतिबंधक कामाचा प्रारंभ

कणकवली, ता. १५ : ओसरगाव (ता.कणकवली) तलावातील गळती प्रतिबंधक कामाचा प्रारंभ आज आमदार नीतेश राणे यांनी केला. या कामासाठी ७० लाखांचा निधी मंजूर झाल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच सुप्रिया कदम, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, ग्रामपंचायत सदस्य रिया नाईक, वंदना पारकर, राहुल आंगणे, पोलिसपाटील सौ. आंगणे, अर्जुन देसाई, सुदर्शन नाईक, गजानन तळेकर, रवी देसाई, रवी कावले, नाना परब, सुनील साटम, एड. विलास परब, प्रवीण नाईक, संतोष कदम, गणेश राणे, गणेश कदम, अक्षया राणे, प्रदीप राणे, संदेश राणे, प्रदीप तळेकर, परशुराम कारळेकर, नाथा नालंग आदी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे ओसरगाव येथील तलावातील पाणी गळती थांबवावी, अशी मागणी स्थानिकांतून होत होती. यंदाच्या बजेटमध्ये त्‍यासाठी ७० लाखांचा निधी मंजूर झाला. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होईल, असा विश्‍वास श्री. राणे यांनी व्यक्‍त केला.
-------
चौकट
ओसरगाव लवकरच पर्यटनस्थळ ः राणे
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेला ओसरगाव तलाव हा पावसाळ्यात पर्यटकांचे विशेष आकर्षण असते. गळती प्रतिबंधक काम पूर्ण झाल्‍यानंतर येथे बारमाही पाणीसाठा होणार आहे. त्‍यामुळे तलाव परिसराचे सुशोभीकरण आणि पर्यटकांसाठी आवश्‍यक सुविधांच्या उभारणीसाठी आराखडा तयार केला जाणार असल्‍याची माहिती आमदार श्री. राणे यांनी दिली.