बेळगावच्या डॉक्टरास आंबोलीत मारहाण

बेळगावच्या डॉक्टरास आंबोलीत मारहाण

02985
आंबोली ः अज्ञात तरुणांनी मोटारीचे केलेले नुकसान.

बेळगावच्या डॉक्टरास आंबोलीत मारहाण

चौघांवर गुन्हा दाखल; बाचाबाचीतून प्रकार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः बेळगाव येथील केएलई रुग्णालयाच्या डॉक्टरची आंबोली घाटात सिनेस्टाईलने मोटार अडवून अज्ञात चौघा तरुणांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या मोटारीचेही मोठे नुकसान करण्यात आले. हा प्रकार रविवारी (ता. १४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास आंबोली घाटात दाणोलीपासून तीन किलोमीटर अंतरावर घडला. याप्रकरणी संबंधित डॉ. धीरज शिवराम पोळ (वय ३४, रा. बसवेश्वर सर्कल, निपाणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी डॉ. पोळ हे गोवा ते निपाणी असे आपल्या पत्नी व मुलांसह मोटारीने प्रवास करत होते. यावेळी दाणोली येथे त्यांच्या मागून येणाऱ्या मोटारचालकाने (एमएच १४ जीए २८७४) त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत ‘‘मोटार हळू का चालवतो’’, असे विचारून वाद घातला. एवढ्यावरच न थांबता पुढे जाऊन त्या चालकाने आपली मोटार त्यांच्या मोटारीसमोर आडवी लावली. त्या मोटारीतून उतरलेल्या चौघांनी डॉ. पोळ यांना गाडीतून खाली खेचून मारहाण केली. त्यातील दोघांनी मोठा दगड घेऊन त्यांचा मोटारीची तोडफोड केली. अन्य दोघांनी मोटारीत बसलेल्या त्यांच्या पत्नीला दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर ते चौघेही मोटारीतून निघून गेले. या सर्व प्रकारामुळे भेदरलेल्या डॉ. पोळ व त्यांच्या कुटुंबीयांनी आंबोली दूरक्षेत्रात थांबून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस हवालदार दीपक शिंदे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com