सिंधुदुर्गनगरी ः पोलिस हवालदार सुशील घाडीगावकर यांना महासंचालक पदाने गौरविताना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी.

हवालदार घाडीगावकर यांचा
महासंचालक पदकाने गौरव

सिंधुदुर्गनगरी ः पोलिस हवालदार सुशील घाडीगावकर यांना महासंचालक पदाने गौरविताना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी. हवालदार घाडीगावकर यांचा महासंचालक पदकाने गौरव

03069
सिंधुदुर्गनगरी ः पोलिस हवालदार सुशील घाडीगावकर यांना महासंचालक पदाने गौरविताना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी.

हवालदार घाडीगावकर यांचा
महासंचालक पदकाने गौरव
सिंधुदुर्गनगरी ः रानबांबुळी (ता.कुडाळ) येथील रहिवासी असलेल्या व पोलीस मुख्यालय ओरोस येथे प्रशिक्षक म्हणून हजारो प्रशिक्षणार्थीना घडविणाऱ्या पोलीस हवालदार सुशील घाडीगावकर यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले.
रानबांबुळी येथील रहिवासी असलेल्या आणि पोलीस मुख्यालय ओरोस येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस हवालदार घाडीगावकर यांना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दहा वर्षे प्रशिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. हजारो पोलीस प्रशिक्षणार्थींना घडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. रानबांबुळी रहिवासी संघात गेली वीस वर्षे कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत पोलिस सेवा बजावत असताना ११८ बक्षिसे व दहा प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. कोरोना महामारीच्या काळात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या कोविड रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक ते सहकार्य करून तसेच समाजसेवा व मदत कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या प्रामाणिक सेवेची दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
................
मालवण देवी भैरवीचा आजपासून वर्धापन
मालवण : येथील संतसेना मार्गावरील नाभिक बांधवांची कुलदैवता देवी भैरवी मंदिरचा १४ वा वर्धापन दिन सोहळा १६ ते २१ मे या कालावधीत आयोजित केला आहे. यानिमित्त श्री देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
उद्या (ता.१६) भैरवी मंदिरात होम होणार आहे. यावेळी देवीचा नारळ बदलण्यात येणार आहे. २० ला सत्यनारायण महापूजा, सायंकाळी सुनील परुळेकर यांचे गायन, रात्री देवी सातेरी भजन मंडळ कांदळगावचे बुवा राजेंद्र कोदे यांचे भजन, ओम भद्रकाली दशावतार नाट्यमंडळ, पेंडुर यांचा ‘कालसर्प’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. २१ ला रात्री ८ वाजता रवळनाथ भजन मंडळ आडवलीचे बुवा विनायक भिडे व ब्राह्मणदेव भजन मंडळ कातवडचे बुवा मंगेश नलावडे यांच्यात डबलबारी भजन सामना रंगणार आहे. भिडे यांना पखवाज साथ गौरव लाड व तबला साथ प्रसाद यादव तर नलावडे यांना पखवाज साथ गौरव चव्हाण व तबला साथ मनीष डिकवलकर करणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने केले आहे.
--
आचरा येथे आज शोकसभा
आचरा ः येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर व वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी यांचे नुकतेच निधन झाले. आचरे गावच्या सांस्कृतिक पर्वातील एक मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या (ता. १६) दुपारी ४ वाजता श्री रामेश्वर संस्थानच्या भक्तनिवास सभागृहात शोकसभेचे आयोजन केले आहे. श्रीकांत सांबारीप्रेमींसह ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आणि वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
--
होडावडेत शनिवारी विविध कार्यक्रम
वेंगुर्ले ः होडावडे-सातार्डेकरवाडी येथील ब्राह्मणदेव वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. २०) सकाळी धार्मिक कार्यक्रमांसह श्रींची महापूजा व सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य शिवाजीराव पालव यांचे ‘सुखी जीवनाचे पंचशील’, या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विक्रम सातार्डेकर व आत्माराम गावडे यांनी केले.
---
आरोग्य शिबिरास सातुळीत प्रतिसाद
सावंतवाडी ः सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सावंतवाडी येथील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सातुळी येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील, जनरल फिजिशियन डॉ. साईनाथ सीतावार, डॉ. ललित विठलानी यांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्णांची ब्लडशुगर व हिमोग्लोबीन तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरासाठी संस्थेचे उमाकांत वारंग, अन्नपूर्णा कोरगावकर यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी स्वराज्य ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
----------------
वेंगुर्लेत २७ ला पुरस्कार वितरण
वेंगुर्ले ः विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशनतर्फे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळा २७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता येथील नगरवाचनालयात होणार आहे. फाउंडेशनचे संस्थापक अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक कवी गोविंद काजरेकर, कवी वीरधवल परब, पाली साहित्याचे अभ्यासक देवेंद्र उबाळे, कवी विठ्ठल कदम आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी कल्पना मलये यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
कणकवलीत गुरुवारी नाभिक मंडळाची सभा
मालवण ः महाराष्ट्र नाभिक मंडळ जिल्हा शाखेची बैठक गुरुवारी (ता. १८) दुपारी तीनला कणकवली येथील भालचंद्र महाराज मठानजीक अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक यादव यांची प्रमुख उपस्थिती आहे. राज्य संघटक विजय चव्हाण, राज्य सरचिटणीस राजन पवार, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, प्रसिद्धी प्रमुख गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बैठकीत ब्युटी पार्लर असोसिएशनची माहिती, महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नियमावली विषयी चर्चा करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी केले आहे.
------------------
काँग्रेस कार्यकर्त्यांचा तेंडोलीत जल्लोष
कुडाळ ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्याने तेंडोली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, रामचंद्र राऊळ, ग्रामपंचायत सदस्य आकाश मुणनकर, गुरुनाथ पारकर, सुनील गावडे, पंढरी गावडे, ओमकार गावडे, सुनील मुणनकर, निखिल तेंडोलकर, संदीप तेंडोलकर, सुभाष नाईक, गुरू तेंडोलकर, सागर गावडे, रवी कोळकर, प्रकाश पारकर, गीतांजली राऊळ, गणेश राऊळ, तिमाजी राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com