कुडाळातील नाडकर्णी यांचा प्रामाणिकपणा

कुडाळातील नाडकर्णी यांचा प्रामाणिकपणा

कुडाळातील नाडकर्णी यांचा प्रामाणिकपणा
कुडाळ, ता. १५ ः शहरातील क्षितिज कॉम्प्लेक्स ते कुडाळ नवीन एसटी बस आगार यादरम्यान रस्त्यालगत पडलेली बॅग तेथील रहिवासी शेखर नाडकर्णी यांना सापडली. त्यांनी ही बॅग येथील पोलिस ठाण्यात जमा केली. सायंकाळी उशिरा या बॅगसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर ती वेंगुर्ले येथील आराम बसमधील प्रवाशाची असल्याचे निष्पन्न झाले.
क्षितिज कॉम्प्लेक्स येथील रहिवासी नाडकर्णी हे आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला जात असताना एसटी आगारादरम्यान त्यांना रस्त्यालगत पडलेली बॅग सापडली. त्यांनी ती तातडीने पोलिस ठाण्यामध्ये जमा केली. पोलिसांच्या माहितीनंतर संबंधित आरामबसमधील काहीजण पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी बॅग दाखविली असता ती वेंगुर्ले येथील एका प्रवाशाची असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रवाशाशी फोनवर संपर्क साधून त्यांना बॅगची ओळख पटवून ती घेऊन जाण्याची सूचना देण्यात आली. सायंकाळी उशिरा हे प्रवासी येथील पोलिस ठाण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com