संतोष चव्हाण मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतोष चव्हाण मृत्यूप्रकरणी 
सखोल चौकशीची मागणी
संतोष चव्हाण मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

संतोष चव्हाण मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

sakal_logo
By

03097
संतोष चव्हाण

संतोष चव्हाण मृत्यूप्रकरणी
सखोल चौकशीची मागणी

घातपाताचा संशय; नातेवाईक पोलिसांत

सावंतवाडी, ता. १५ : कोलगाव-चव्हाणवाडी येथील संतोष वासुदेव चव्हाण (वय ४२) या तरुणाचा मृतदेह कोलगाव आणि सावंतवाडी नगरपालिका हद्दीवर असलेल्या ओहोळाशेजारी सापडला होता. मृत संतोषचे काका बाबुराव चव्हाण यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. याबाबत आज त्यांनी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली.
मृत चव्हाण यांचे काका कोलगाव सोसायटीचे संचालक बाबुराव चव्हाण, चर्मकार संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर, मृताचे भाऊ सदानंद चव्हाण यांनी पोलिस निरीक्षक मेंगडे यांची भेट घेत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. दरम्यान, मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले असून, याअंतर्गत काही अवयव व्हिसेरा रिपोर्टसाठी रत्नागिरी येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा रिपोर्ट लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर कुटुंबीयांच्या मागणीनुसार संबंधित घटनेची सखोल चौकशी केली जाईल, अशी ग्वाही पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी दिली.