आमदार राणेंच्या उपस्थितीत साकेडी पंच सदस्य भाजपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार राणेंच्या उपस्थितीत
साकेडी पंच सदस्य भाजपात
आमदार राणेंच्या उपस्थितीत साकेडी पंच सदस्य भाजपात

आमदार राणेंच्या उपस्थितीत साकेडी पंच सदस्य भाजपात

sakal_logo
By

03162
कणकवली : येथील ओम गणेश निवासस्थानी समीक्षा परब यांनी आमदार नीतेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.


साकेडीच्या पंच सदस्या
समीक्षा परब भाजपमध्ये

आमदार राणेंच्या उपस्थितीत प्रवेश

कणकवली, ता.१५ : साकेडी (ता.कणकवली) ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्या समीक्षा संतोष परब यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. त्‍यांच्यासोबत साकेडी उपशाखाप्रमुख संतोष परब आणि काही शिवसैनिकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
साकेडी ग्रामपंचायतीसाठी नुकतीच पोटनिवडणूक झाली होती. यात शिवसेनेच्या कार्यकर्त्या समीक्षा परब या बिनविरोध ठरल्‍या होत्या. या निवडीनंतर शिवसेनेकडून त्‍यांचा सत्‍कारही करण्यात आला होता; मात्र आज समीक्षा परब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नीतेश राणे यांनी त्‍यांचे स्वागत केले. त्‍यांच्यासोबत साकेडी गावचे उपशाखाप्रमुख संतोष परब तसेच सूरज यादव, वसीम शेख या शिवसैनिकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी साकेडी सरपंच सुरेश साटम, संदिप सावंत, उपसरपंच वर्दम प्रज्वल, माजी सभापती संजय शिरसाट, रमाकांत सापळे, पंढरीनाथ ढवण, रविंद कोरगावकर, अजित शिरसाट, प्रशांत जाधव, राजू म्हसकर आदी उपस्थित होते.