...अन्यथा आंदोलन!

...अन्यथा आंदोलन!

03123
कणकवली : येथील मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना शिवसेनेचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज आदींनी निवेदन दिले.

वीज व्यवस्था न झाल्यास आंदोलन

माजी नगरसेवक; कणकवलीतील नाईक उद्यानाबाबत मागणी

कणकवली, ता.१६ : शहरातील श्रीधर नाईक उद्यानामध्ये अजूनही विजेची व्यवस्था झालेली नाही. सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील चिमुकली या उद्यानामध्ये खेळत असतात. येत्‍या आठ दिवसांत या उद्यानामध्ये वीज व्यवस्था न झाल्‍यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी आज दिला. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना दिले.
कणकवली नगरपंचायतीमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज आदींनी आज मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेतली. यात शहरातील श्रीधर नाईक उद्यानासह इतर ठिकाणी असलेल्‍या गैरसोयींबाबत निवेदन सादर केले. तसेच या समस्या न सुटल्‍यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
निवेदनात म्‍हटले की, श्रीधर नाईक उद्यानामध्ये तातडीने वीज व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. शहरातील इतर सर्व उद्यानांची दुरवस्था झाल्‍याने शहरातील चिमुकली खेळण्यासाठी श्रीधर नाईक उद्यानामध्ये गर्दी करतात; मात्र या ठिकाणी बिजेची व्यवस्था नसल्‍याने मुलांची तसेच पालकांचीही मोठी गैरसोय होते. याठिकाणी पाण्याची तसेच प्रसाधनगृहाचीही व्यवस्था केली नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
---
इतर काही मागण्या
शहरातील नाथ पै नगर येथील गणपती साणा येथे जाणारा रस्ता अपूर्ण आहे. हा रस्ता तातडीने पूर्ण करण्यात यावा. शहरातील नवीन क्रीडा संकुलातील बॅडमिंडन हॉलमध्ये वीज व्यवस्था केलेली नाही. तेथे तातडीने वीज व्यवस्था करा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
--
कोट
श्रीधर नाईक उद्यानामधील वीज व्यवस्था तसेच इतर अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबधित ठेकेदाराला दिले आहेत. तसेच उद्यान आणि शहरातील इतर प्रलंबित कामे वेळेत काम पूर्ण करून घेण्याबाबत नगरपंचायत अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले आहेत.
- अवधूत तावडे, मुख्याधिकारी, कणकवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com