वासुदेव वाघे बुवांसारखी माणसेच संस्कृती दर्शक

वासुदेव वाघे बुवांसारखी माणसेच संस्कृती दर्शक

२१ (टूडे ३ साठी किंवा पान २ साठी)

- rat१४p२०.jpg-
23M03156
रत्नागिरी : वासुदेव वाघे दांपत्याचा सत्कार करताना डॉ. अनिल फडके. सोबत डॉ. दिलीप पाखरे, संतोष पावरी, भगवानबुवा लोकरे,दामोदर लोकरे, साईनाथ नागवेकर आदी.

वासुदेव वाघे बुवा संस्कृती दर्शक

डॉ. पाखरे; महापुरुष मंडळातर्फे कृतज्ञता सोहळा

रत्नागिरी, ता. १६ : अत्यंत कष्टाळू आणि खारवी समाजातील संस्कृती शोधक असलेले वासुदेव वाघेबुवा हे जिल्हा रुग्णालयात नोकरी करताना सातत्याने रुग्णाच्या भल्यासाठी प्रयत्न केले. तसेच खेडोपाडी असलेले व कधीही उजेडात न आलेल्या भजनी बुवा, कलाकारांना शोधत राहिले. त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न गेली वीस ते पंचवीस करत आहेत. वाघेबुवांसारखी माणसे संस्कृतीदर्शक आहेत व खरे प्रेरणेचे स्त्रोत आहेत, असे गौरवोद्गार डॉ. दिलीप पाखरे यांनी काढले.
जिल्हा रुग्णालयातून वासुदेव वाघे सेवानिवृत्त झाल्यानिमित्त पूर्णगड येथील श्री देव महापुरूष भजन मंडळ व मित्रपरिवाराने उद्यमनगर येथील खारवी समाज भवनात कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला. त्यावेळी डॉ. पाखरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल फडके गुरुजी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष संतोष पावरी, डॉ. प्रशात मुतडक (नाशिक), भजनसम्राट भगवानबुवा लोकरे, रंगकर्मी राम सारंग, दामोदर तथा अण्णा लोकरे, साईनाथ नागवेकर, संतोष मयेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. वाघे यांचा श्रीफळ, चांदीची विठ्ठ्ल रखुमाई मूर्ती देऊन गौरव केला.
वाघे बुवा यांच्या साठीनिमित्त तांदूळ आणि साखर या वस्तू ठेवून तुला करून पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. या सर्व वस्तू वृद्धाश्रमाला देण्यात येणार आहेत. प्रास्ताविक रगेश लाकडे यांनी केले. सुधीर वासावे, बबन आडविरकर, संदिप वणकर, संजय डोर्लेकर, विजय आडविरकर, संजीवनी वाघे चौघुले मनोगते व्यक्त केली. आपण माझ्यावर असणारे प्रेम व दिलेल्या शुभेच्छांचा आयुष्यभर ऋणी राहीन. आपण हा केलेला सत्कार सन्मान माझा नसून आपला सर्वांचा आहे, असे सत्काराला उत्तर देताना वाघे यांनी सांगितले.
खारवी समाजातील ज्येष्ठ नेते विष्णूशेठ पवार, पूर्णगड खारवी समाज परिवर्तन मंच महिला अध्यक्षा सरोज हरचकर, खारवी समाज दापोलीचे अध्यक्ष श्री. नाटेकर, गावडे आंबेरे सरपंच लक्ष्मण सारंग, दादा वाडेकर, प्रविण सावंतदेसाई, नुरमहमंद धालवेलकर, सुभाष तारये, शशिकला अळवणी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजाराम नाटेकर, शैलेश आंबेरकर, दिनेश डोर्लेकर, मनोहर डोर्लेकर, संजय खडपे, बबन आडविरकर, कमलेश लाकडे, विजय आडविरकर यांनी मेहनत घेतली. वामन डोर्लेकर व रवींद्र सारंग यांनी सूत्रसंलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com