डेरवण क्रीडा संकुलात फुटबॉल स्पर्धेचा थरार

डेरवण क्रीडा संकुलात फुटबॉल स्पर्धेचा थरार

३९ ( पान ५ )

rat१४p३८.jpg _
२३M०२९०९
चिपळूण - स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघ

डेरवण क्रीडा संकुलात फुटबॉल स्पर्धेचा थरार

चिपळूण, ता. १६ ः फुटबॉल असोसिएशन ऑफ रत्नागिरी आणि एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल यांच्या विद्यमाने रविवार १४ मे रोजी डेरवण क्रीडा संकुलात २००९ व २०१० या वर्षांत जन्मलेल्या १५ वर्षाखालील मुलांसाठी ‘७ अ’ साईड फुटबॉल’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला ८ तालुक्यातून एकूण ९२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. फुटबॉलच्या राज्य संघटनेद्वारे (WIFA) मे च्या अखेरीस धुळे येथे आयोजित केलेल्या आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाची निवड या स्पर्धेतून करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद म्हस्के, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव धनराज मोरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हातील ज्येष्ठ क्रीडा संघटक संदीप तावडे यांनीही फुटबॉल मधील गुणवत्ता वाढवून येथील खेळाडू देश पातळीवरील स्पर्धांमध्ये चमकेल असा आशावाद व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात स्पोर्को चिपळूण विजयी तर चिपळूण एफसी उपविजयी संघ ठरला. विजेत्या खेळाडूंना चषक व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. जिल्हा संघासाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचे सराव शिबीर २१ ते २३ मे रोजी एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल येथे होणार असून, निवड केलेला संघ हा २३ मे रोजी धुळे येथे आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com