
‘यशवंतराव भोसले फार्मसी’त पदवीदान समारंभ उत्साहात
03145
सावंतवाडी ः यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ उत्साहात झाला.
‘यशवंतराव भोसले फार्मसी’त
पदवीदान समारंभ उत्साहात
सावंतवाडी, ता. १६ ः येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये चौथा पदवीदान समारंभ उत्साहात झाला. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये बी.फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने दिलेल्या पदव्या यावेळी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कुडाळ येथील चार्टर्ड अकाउंटंट केशव फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, पत्रकार नितीन पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, प्रा. डॉ. विजय जगताप आदी उपस्थित होते. या समारंभात शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या संकेतानुसार मान्यवरांनी पारंपरिक पगडी पोशाख व विद्यार्थ्यांनी पदवी पोशाख परिधान केला होता. पालकवर्गाला निमंत्रित केल्याने सर्व पालकांना हा गौरवास्पद क्षण अनुभवता आला. फाटक यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी त्रिसूत्री कानमंत्र दिला. यामध्ये कामाच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम, आत्मकेंद्रियता व इतरांविषयी कृतज्ञता भाव जपणे या तीन गोष्टींचा समावेश होता. अॅड. सावंत-भोसले यांनी अर्थार्जनासाठी आजीवन शिक्षणाचे महत्त्व विशद केले. दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. यावेळी मुंबई येथील पत्रकार पाटील यांनी ‘सकारात्मक दृष्टिकोनाचे जीवनातील महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. प्रणाली जोशी व प्रा. नमिता भोसले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. तुषार रुकारी व प्रा. गौरवी सोन्सूरकर यांनी आभार मानले.