21 पासून कलशारोहण सोहळा

21 पासून कलशारोहण सोहळा

१७ (टुडे पान ३ साठी)

केळणेतील रामवरदायिनी मंदिराचा
रविवार पासून कलशारोहण सोहळा

पावस, ता. १६ ः खेड तालुक्यातील केळणे येथील श्री रामवरदायिनी, श्री केदार, श्री काळकाई, श्री पद्मावती मंदिराचा जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा २१ ते २३ मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तसेच केळणे नं. १ शाळेचा अमृत महोत्सव सोहळादेखील होणार आहे.
२१ मे रोजी पहाटे ५ ते ७ वा. वास्तुशांती व विविध धार्मिक विधी, सकाळी ८ ते २ मूर्ती व कलश मिरवणूक, दुपारी २ ते ३ महाप्रसाद, ३ ते ४ प्रवचन, सायं. ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ९.३० वा. हरिकीर्तन, रात्री ११ नंतर हरिजागर, २२ ला पहाटे ४ ते ५ काकड आरती, ५ ते ७.३० अभिषेक होमहवनादी विधी, ७.३० ते ८ नूतन मूर्ती आसनव्यवस्था पूजन, १० ते १२ प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, होमहवन व कुमारीका पूजन, १२ ते १२.३० उद्घाटन, १२.३० ते १.३० प्रवचन, आरती व दर्शनसोहळा, सायं. ३ ते ५ वा. केळणे शाळा नं. १ चा अमृत महोत्सव कार्यक्रम, ६ ते ७ हरिपाठ, ७.३० ते ९.३० हरिकीर्तन, १०.३० नंतर हरिजागर होईल. २३ ला पहाटे ४ ते ६ काकड आरती, ८ ते १० धालकाठी पूजन व विधीवत तोडणे, १० ते १२ धालकाठी मिरवणूक व धालकाठी रोहण, १२ ते ९ सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते २ महाप्रसाद आणि त्यानंतर सत्कार समारंभ होणार आहे. या वेळी खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम आदी उपस्थित राहणार आहेत. सायं. ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ९ महाप्रसाद, रात्री १० वा. कार्यक्रम वैभव म्युझिकल डान्स ऑर्केस्ट्रा व नाटक असे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीरामवरदायिनी जीर्णोद्धार समिती अध्यक्ष विलास कदम यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com