
कोयना प्रकल्पातून 2 लाख दशलक्ष युनिट वीजनिर्मिती
३ (टुडे पान १ साठी)
कोयनेतून २ लाख दशलक्ष युनिट वीजनिर्मिती
६१ वर्षे पूर्ण ; दरवर्षी ६० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
चिपळूण, ता. १६ ः सह्याद्रीचे भूषण व अभियांत्रिकीचे आश्चर्य असणाऱ्या कोयना धरण व जलविद्युत प्रकल्पाला १६ मे रोजी ६१ वर्ष पूर्ण झाली. सहा दशकात २ हजार मेगावॅट क्षमतेने वीजनिर्मिती करणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून आतापर्यंत २ लाख दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
१९६२ पासून अविरतपणे स्वच्छ, नितळ व प्रदूषणविरहित वीजनिर्मिती करणारा कोयना जलविद्युत प्रकल्पाला ६२ वर्षात २ लाख अब्ज निव्वळ नफा झाला आहे. राज्याला सर्वात जास्त महसूल कोयना प्रकल्पातून मिळत असला तरी कोयनेमुळे झालेला औद्योगिक व सामाजिक विकास व त्यामुळे राज्यात दृश्य-अदृश्य परिणाम मोजता येणे अशक्य आहे.
प्रकल्प एक पण फायदे अनेक असणारा कोयना प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी ६० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. महाराष्ट्रातील एकूण जलविद्युत निर्मितीपैकी ५९ टक्के वीज कोयना प्रकल्पातून होते. प्रकल्पाच्या ४ टप्प्याचा विचार करता प्रकल्पातून दरवर्षी मिळणारे उत्त्पन्न ५०० ते ६०० कोटी रुपये होते. हा प्रकल्प राज्याला व देशाला तीनप्रकारे योगदान देऊन राष्ट्रसेवा बजावत आहे. वीजनिर्मिती सिंचनातून फायदा तांत्रिक-यांत्रिक-मानवी कौशल्याचा मिलाफ अशक्यप्राय प्रकल्प यशस्वी कऱण्याचा विश्वास असणारा हा प्रकल्प आहे. कोळसा टंचाई तसेच महत्तम वीजमागणीच्या काळात वीजनिर्मिती करून कोयना प्रकल्पातून राज्यातील जनतेची गरज भागवण्याची कामगिरी करून ऊर्जा क्षेत्रात देशात आपले महत्व अधोरेखित केले आहे.
---
कोट
कोयना प्रकल्पाच्या उजव्या पायथ्याजवळ ८० मेगावॅट क्षमतेचा उदंचन प्रकल्पाच्या बहुउद्देशीय कामाचा प्रस्ताव एसएलटीसीकडून शासनाला सादर झाल्यावर एका महिन्यात या प्रकल्पाला मान्यता देणार आहे.
- अमृता इनामदार, अव्वल सचिव जलसंपदा विभाग
---------
कोट
कोयना प्रकल्पाच्या उजव्या पायथ्याजवळ असणाऱ्या ८० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम २ महिन्यात सुरू होईलच. त्यानंतर प्रकल्पाचा १ हजार मेगावॅट क्षमतेचा ५वा व ६ टप्पा असे दोन प्रकल्पाला गती देणार आहे. विद्युत, सिंचन, पर्यटन या माध्यमातून तिमिराकडून तेजाकडे ही ओळख गडद करणार.
- एच. व्ही. गुणाले, मुख्य अभियंता कोयना प्रकल्प