रत्नागिरी-शासन आपल्या दारीसाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत

रत्नागिरी-शासन आपल्या दारीसाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत

‘शासन आपल्या दारी’साठी मुख्यमंत्री येणार रत्नागिरीत

२५ मे रोजी आयोजन ः जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः नागरिकांना प्रलंबित दाखले तातडीने देता यावेत, यासाठी ''शासन आपल्या दारी'' ही नवी योजना राज्य शासनाने सुरू केली असून, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यातही हजारो दाखले वाटप केले जाणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी हा कार्यक्रमासाठी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येणार आहेत. येत्या २५ मे रोजी रत्नागिरीत हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी ही नवी योजना १३ मे पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यात या योजनेचा आरंभ झाला. विविध योजनांचे प्रलंबित दाखले तातडीने दिले जाणार आहेत. २५ विविध योजनांमधून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७५ हजार दाखल्यांचे वाटप होणार आहे. राजापूर, लांजा व रत्नागिरी तालुक्यासाठीचा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये होणार आहे. पालकमंत्री सामंत यांनी या योजनेचा कार्यक्रम रत्नागिरीत व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार प्रशासनानेही याची तयारी सुरू केली असून, विविध विभागांच्या बैठका आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाल्या आहेत.
सर्वसामान्यांचे सरकार म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने आपली प्रतिमा बनवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत थेट जाता येईल, असे उपक्रम राबवले जात आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सामंत स्वतः विविध उपक्रम राबवत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्रम रत्नागिरी व चिपळूण अशा दोन ठिकाणी होणार आहे. रत्नागिरीतील कार्यक्रमाची जागा दोन-तीन दिवसात निश्चित केली जाणार आहे. त्या ठिकाणीच दाखले देण्याच्यादृष्टीने उपक्रम हाती घेण्यात आला. ५ हजाराहून अधिक दाखल्यांचे वाटप होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com