वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी
वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी

वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी

sakal_logo
By

- फोटो ओळी
- rat१६p१०.jpg-KOP२३M०३१५७ रत्नागिरी ः रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झालेली वंदे भारत एक्स्प्रेस. (छायाचित्र ः तन्मय दाते, रत्नागिरी)


कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत सुस्साट
--
मुंबई-मंडगाव ६ तास ५७ मिनिटात ; जून महिन्यात कायम होणार?
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.१६ : देशभरात जवळपास चौदा मार्गांवर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर कायमस्वरुपी चालवण्यासाठी मंगळवारी (ता. १६) चाचणी घेण्यात आली. सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबई ते मडगाव पावणेसहाशे किमीचे अंतर अवघ्या सहा तास ५७ मिनिटांत पार केले. छत्रपती शिवाजी टर्मिनन्सवरून सुटलेली ही रेल्वे दुपारी निर्धारित वेळेपेक्षा आधीच मडगावला पोचली.
रेल्वे बोर्डाच्या सूचनानुसार कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणार्‍या वंदे भारत एएक्स्प्रेससाठी मंगळवारी पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ट्रायल रन घेण्यात आली. मुंबई ते शिर्डी ही १६ डब्यांची गाडी मंगळवारी शिर्डीला सोडली जात नाही. त्यामुळे आज ती कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात आली. सीएसएमटी येथून सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी ही गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. पुढील काही दिवसात मुंबईतून चिपळूण, रत्नागिरी तसेच गोव्याकडे वातानुकूलित आणि वेगवान वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करता येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबई ते रत्नागिरी हे अंतर अवघ्या ४ तास २७ मिनिटांत, तर पनवेल ते रत्नागिरी जवळपास तीन तासात पूर्ण केले. दरम्यान दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी वंदे भारत एक्स्प्रेस मडगाव येथून मुंबईसाठी रवाना झाली. या चाचणीसाठी कोकण रेल्वेची मेन लाईन खुली ठेवण्यात आली होती. मंगळवारी मुंबई-मडगाव चाचणीसाठी धावलेल्या हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसने हे अंतर अवघ्या ६ तास ५७ मिनिटांमध्ये पार केले. या गाडीची अजून चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होणार आहे.
------
चौकट
अन्य एक्स्प्रेसला लागणारा वेळ

तेजस एक्स्प्रेस- ८ तास ५० मिनिटे
कोकणकन्या- १० तास ४१ मिनिटे
जनशताब्दी- ९ तास
मांडवी एक्स्प्रेस- १२ तास
राजधानी-
----
चौकट
दीड हजार मीटरचे अंतर ५३ सेंकदात केले पार
बुलेट ट्रेनचे स्वप्न अपुरे असले तरी देशातील सर्वात अत्याधुनिक आणि सेमी स्पीड अशी वंदे भारत एक्स्प्रेसची आज चाचणी घेण्यात आली. मुंबई ते शिर्डी दरम्याद धावणार्‍या गाडीला साप्ताहिक सुटटी असल्यामुळे ती येथे चालवण्यात आली. रत्नागिरीत स्थानकातून ही गाडी १०.२३ मिनिटांनी गोव्याकडे रवाना झाली. रत्नागिरी ते निवसर मार्गावरील पोमेंडीतील महालक्ष्मी पुल, बाणेवाडी बोगदा आणि पानवलचा मोठा पूल असे १५७० मीटरचे अंतर या गाडीने अवघ्या ५३ सेंकदात पार केले, असे रत्नागिरीतील अभ्यासक उदय बोडस यांनी सांगितले.