श्री लिंगेश्वर जानवली मंडळ प्रथम

श्री लिंगेश्वर जानवली मंडळ प्रथम

03167
सरमळे ः जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतील विजेत्या श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कणकवली यांना गौरविताना अर्चना घारे-परब व अन्य.


श्री लिंगेश्वर जानवली मंडळ प्रथम

सरमळेतील भजन स्पर्धा; पंचक्रोशीमध्ये सरमळे अव्वल

ओटवणे, ता. १६ ः श्री सातेरी भगवती कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त १४ व १५ मे दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ जानवली-कणकवली भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे-परब उपस्थित होत्या. यावेळी सरपंच विजय अंकुश गावडे, उपसरपंच दिवाकर गावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे अध्यक्ष समीर गावडे, उपाध्यक्ष संजय गावडे, सचिव रवींद्र सावंत, खजिनदार सागर गावडे, गावचे मानकरी गंगाराम गावडे, नाना गावडे, अविनाश गावडे, अर्जुन गावडे आदी उपस्थित होते. अशा कार्यक्रमांमुळे युवा कलाकारांना प्रेरणा व व्यासपीठ मिळत असून यामुळे जिल्ह्यात संगीत सम्राट निर्माण होतील, असे गौरवोद्गार सौ. घारे यांनी यावेळी काढले.
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत प्रथम श्री लिंगेश्वर प्रासादिक कणकवली जानवली (बुवा योगेश मेस्त्री), द्वितीय श्री मोरेश्वर प्रासादिक नेरुर (बुवा भार्गव गावडे), तृतीय श्री देवी सातेरी प्रासादिक मातोंड (बुवा विशाल घोगळे) आदींसह उत्तेजनार्थ श्री दत्तकृपा प्रासादिक वैभववाडी व श्री गोठण प्रासादिक वजराट तसेच उत्कृष्ट गायक-सत्यनारायण करंगुटकर (साटेली), तबला-अक्षय कांबळी (साटेली), पखवाज-कुणाल आळवे (साटेली), हार्मोनियम-अमोल गवस, चकवी-मनोज तांबे, उत्कृष्ट संघ-वजराट, शिस्तबद्ध संघ-श्री लिंगेश्वर कणकवली यांना गौरविण्यात आले. सरमळे पंचक्रोशी मर्यादित भजन स्पर्धेत श्री सप्तसूर प्रासादिक सरमळे, श्री ब्राह्मणदेव प्रासादिक सोनुर्ली, श्री माउली प्रासादिक बाळवाट यांनी प्रथम तीन, तर उत्तेजनार्थ श्री रवळनाथ ओटवणे, श्री ब्राह्मणदेव डेगवे यांनी उत्तेजनार्थ तसेच उत्कृष्ट गायक-श्री सप्तसूर सरमळे, हार्मोनियम-श्री सप्तसूर सरमळे, पखवाज-श्री ब्राह्मणदेव सोनुर्ली, तबला- श्री ब्राह्मणदेव सोनुर्ली, चकवी-श्री ब्राह्मणदेव सोनुर्ली, कोरस-श्री ब्राह्मणदेव सोनुर्ली, शिस्तबद्ध संघ-श्री माउली बाळवाट यांचा गौरव करण्यात आला. संजय दळवी, महेश सावंत यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com