संक्षिप्त

संक्षिप्त

माळवाशीतील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरवात
देवरूख ः माळवाशी गावात जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरवात झाली आहे. या रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून खड्डे पडले होते. माळवाशी फाट्यापासून सुमारे अर्ध्या किलोमीटरवर रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आले होते तरीही पावसाने या रस्त्याची दुरवस्था झाली होती. ही बाब गावचे उपसरपंच सुनील सावंत यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार शासनाच्या एका विकासनिधी कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध होण्यासाठी सावंत यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. निधी प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरवात झाली असून माळवाशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील अनेक दिवस येथील ग्रामस्थांचा खड्ड्यांतून प्रवास सुरू होता. वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे लहानमोठे अपघात घडण्याची शक्यता होती. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत होते.
---------------------
rat16p2.jpg
03117
रत्नागिरी ः श्री गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील अमृतवेल कॉम्प्लेक्स येथे प्लानिंग कन्सल्टन्सी या कार्यालयाचे उद्घाटन घाग सन्सचे विकासक प्रफुल्ल घाग यांच्या हस्ते झाले त्या वेळी उपस्थित मान्यवर.

प्लानिंग कन्सल्टन्सी कार्यालयाचे उद्घाटन
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील अमृतवेल कॉम्प्लेक्समध्ये प्लानिंग कन्सल्टन्सी या नगररचना, घरबांधणी, रहिवासी, अभिन्यास, मुल्यांकन, वास्तूशास्त्र क्षेत्रात सल्ला देणाऱ्या कार्यालयाचे घाग सन्सचे विकासक ज्येष्ठ रंगकर्मी प्रफुल्ल घाग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी प्लानिंग कन्सल्टन्सीचे प्रमुख शिवप्रसाद धुपकर, सुहास शिंदे व अक्षय शिंदे यांच्यासह प्लांट व मशिनरीचे मुल्यांकन तज्ज्ञ गोविंद भारद्वाज, स्वरूप हॉटेलचे प्रदीप साळवी, जाधव फिटनेस अॅकॅडमी व जाधव कन्स्ट्रक्शनचे हेमंत जाधव, सेवानिवृत्त उपअभियंता मिलिंद मडकईकर उपस्थित होते. यावेळी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला विनामुल्य सेवा देण्याचे धूपकर व शिंदे यांनी जाहीर केले. बिनशेती रेखांकन, सीआरझेड, चटईक्षेत्र, विकासयोजना, नगररचना योजना, बांधकाम परवानगीसाठी अंमलात आलेली ऑनलाईन परवानगीची पद्धत याबाबत आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ लोकांना मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

------------------------
rat16p3.jpg
03118
गुहागर ः अध्यक्षपदी नियुक्तीनंतर ॲड. सुशील अवेरे यांचा सत्कार करण्यात आला.

औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अवेरे
गुहागर ः शृंगारतळी येथे महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ संचलित गुहागर तालुका औद्योगिक बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. सुशील अवेरे व उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची निवड करण्यात आली. या संस्थेची संचालक निवड मागील महिन्यामध्ये झाली आहे. या निवडणुकीमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष विजय लांजेकर व त्यांच्या पत्नी विभावरी लांजेकर, मंगेश कोंडविलकर, प्रफुल्ल विखारे, सत्यवान नांदलस्कर, अमित अवेरे, किरण अवेरे, मयूर कानसे, संतोष आग्रे, शलाका काष्टे आणि ॲड. सुशील अवेरे हे संचालक म्हणून निवडून आले होते. सोमवारी (ता. १५) रोजी सर्व संचालकांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक पार पडली. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व संचालकांना सोबत घेऊन, गुहागर तालुक्यातील अनेक क्षेत्रातील मान्यवर व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष ॲड. अवेरे यांनी सांगितले.
------------------------------

भगवा चषक कबड्डी स्पर्धा उद्यापासून
रत्नागिरी ः शिवसेना युवासेना व शिवप्रतिष्ठान रत्नागिरीतर्फे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शहरातील शिवसेना संपर्क कार्यालय, आठवडाबाजर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा १८ व २० मे रोजी भव्य भगवा चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेचा आरंभ खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार असून या वेळी आमदार राजन साळवी, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक उपस्थित राहणार आहेत. पारितोषिक वितरण समारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते २० रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com