महिला लोकशाही दिनात तक्रार अर्जच नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला लोकशाही दिनात तक्रार अर्जच नाहीत
महिला लोकशाही दिनात तक्रार अर्जच नाहीत

महिला लोकशाही दिनात तक्रार अर्जच नाहीत

sakal_logo
By

१६ (पान २ साठी)

महिला लोकशाही दिनात तक्रार नाही


रत्नागिरी, ता. १६ ः जिल्हा प्रशासनाच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवण्यात आलेल्या महिला लोकशाही दिनास एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. गेल्या वर्षभरात या विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या महिला लोकशाही दिनाच्या उपक्रमात फक्त ११ महिलांनी अर्ज दाखले केले आहेत.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. यात येणाऱ्या महिलांच्या प्रश्नाचा निपटारा लवकर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची अनोखी मोहीम हातात घेण्यात आली होती. ज्या महिलांना प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाला हजर राहणे शक्य होणार नाही अशा महिलांना आता फोनवरून आपली तक्रार नोंदवता येणार होती. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थिता राहता येणार नाही अशा महिलांच्या सोयीच्यादृष्टीने जिल्ह्यातील माहिलांना प्रायोगिक तत्त्वावर फोनद्वारे संपर्क करून १५ मे २०२३ च्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यलय रत्नागिरी यांच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर दुपारी १२ ते १ या वेळेत त्यांचे निवेदन अर्ज नोंदवता येतील, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य महिला लोकशाही दिन समिती यांच्याकडून कळवण्यात आले होते; मात्र लोकशाही दिनासाठी एकही अर्ज अथवा दूरध्वनी दाखल झालेला नाही.