लांजा-लांजा शहरात महामार्गाच्या दुरुस्तीला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-लांजा शहरात महामार्गाच्या दुरुस्तीला सुरवात
लांजा-लांजा शहरात महामार्गाच्या दुरुस्तीला सुरवात

लांजा-लांजा शहरात महामार्गाच्या दुरुस्तीला सुरवात

sakal_logo
By

-rat16p13.jpg
03177
लांजा ः अखेर मुंबई-गोवा महामार्गाच्या लांजा शहरातील दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली.

लांजा शहरात महामार्गाच्या दुरुस्ती सुरू

लांजा, ता. १६ ः लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील महामार्गाचे डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा लांजा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेससह व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.
लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाची अतिशय दुरवस्था झाली होती. मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. तून ट्रेलरसारखे एखादे वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धूळ उडून व्यापारीवर्गाच्या मालाचे नुकसान होत होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका हा व्यापारीवर्गाला सहन करावा लागत होता. त्यामुळे व्यापारीवर्ग पुरता हैराण झाला होता. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील महामार्गाच्या डागडुजीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली होती. अखेर या कामाला सुरवात झाली आहे. शहरातील सर्व खड्डे पडलेल्या ठिकाणी डांबरीकरण केले जात असून रस्ता वाहतूकयोग्य केला जात आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार, अखेर कामाला सुरवात झाल्याने व्यापारी संघटनेसह लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने समाधान व्यक्त केले आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के, युवकचे अध्यक्ष बाबा धावणे, पदाधिकारी दाजी गडहिरे यांनी या डांबरीकरणाच्या दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.