शाळेचा विकास ही प्रत्येकाची जबाबदारी

शाळेचा विकास ही प्रत्येकाची जबाबदारी

03200
डोंगरपाल ः येथे माऊली विद्यामंदिरात उपस्थित माजी विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

शाळेचा विकास ही प्रत्येकाची जबाबदारी

दयानंद कुबल; डोंगरपालमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळा

बांदा, ता. १६ ः सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम हे ज्ञानमंदिर करत असते. गावाची अस्मिता असलेली शाळा वाचविणे ही माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचीही तेवढीच जबाबदारी आहे. डोंगरपाल माऊली विद्यामंदिर नव्याने उभारण्यासाठी माजी विद्यार्थी म्हणून आपले निश्चितच सहकार्य असेल. त्यादृष्टीने काम देखील सुरू असल्याची ग्वाही माजी विद्यार्थी तथा कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी डोंगरपाल येथे दिली.
डोंगरपाल येथील श्री माऊली विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात कुबल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी विलास सावंत, देविदास नाडकर्णी, प्रमोद कामत, नारायण सावंत, गुणाजी गवस, रामदास नाईक, माजी विद्यार्थी संघटनेचे दयानंद कुबल, जयेश सावंत, निकिता कुबल, अमित गवस, रुपेश गवस, गोविंदराज गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुबल यांनी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने हायस्कूल वाचविण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत मार्गदर्शन केले. विद्यालयाची पटसंख्या वाढविण्यासाठी वसतिगृह निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी वाहन सुविधा उपलब्ध करणे, अतिरिक्त इंग्रजी शिक्षक उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या आणि पंचक्रोशीतील शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, वेगवेगळे उपक्रम करणे, संस्थेचे सभासदत्व घेऊन कामात मदत करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
याबाबत सखोल चर्चा होऊन वसतिगृह आणि वाहन सुविधा उपलब्ध करण्यापासून कामाची लवकरात लवकर सुरुवात करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. प्रमोद कामत, नारायण सावंत यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऋग्वेदिता देसाई, कृष्णा राणे, बाळकृष्ण राणे, घनःश्याम गवस, बाळकृष्ण गवस, श्री. कदम आदी उपस्थित होते. अरुण देसाई यांनी प्रास्ताविक केले. संतोष वावळीये यांनी सूत्रसंचालन केले. विलास सावंत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com