संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१६p१७.jpg ः KOP२३M०३१८४ आंजर्ले ः आंजर्ले प्रतिष्ठानच्यावतीने आंजर्ले भूषण पुरस्कार सागर पारदुळे यांना प्रदान करताना सुरेश सरनोबत.


सागर पारदुळेना आंजर्ले भूषण पुरस्कार प्रदान
दाभोळ ः कबड्डी खेळात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सागर पारदुळे याचा आंजर्ले भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आंजर्ले येथील एम. के. इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात याच शाळेचा माजी विद्यार्थी असलेल्या सागर पारदुळेने कबड्डी खेळात जिल्ह्यात नाव कमावले असून अनेक खेळाडूही तयार केले आहेत. त्यामुळे आंजर्ले गावाचे नाव मोठे केल्याने आंजर्ले प्रतिष्ठानच्यावतीने त्याचा आंजर्ले भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आंजर्ले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश सरनोबत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मंगेश महाडिक, सुरेश म्हादलेकर, मुख्याध्यापक गोरिवले, उद्योजक शिरीष जोशी उपस्थित होते. याच कार्यक्रमात सर्पमित्र मनित, प्रतीक बाईत व दिल्ली येथे झालेल्या मिनी ऑलिपिंक लाठीकाठी स्पर्धेमधे यश मिळवणाऱ्या एम. के. इंग्लिश स्कूल आंजर्ले या प्रशालेच्या ईशान पवार, यश बटावळे, तनिष्क राऊत, भक्ती झाडेकर, तेजश्री जोशी, सिद्धेश कांबळे, जिया रहाटवळ या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.


मेहता स्कूलचा निकाल १०० टक्के
दाभोळ ः करंजाणीतील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएससी शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. नयना मणियाथ हिने ९५.२ टक्के गुण मिळवून प्रथम, साई बिडलाने ८९.८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर जाहिद जोगीलकरने ८७.२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. ब्रिलियंट करिअर अॅकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूलची तनिष्का केळकर हिने सीबीएससीमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये बाजी मारली असून ९० टक्के गुण मिळवले. सावरी जोशी व मुसद्दीक टेटवलकर यांनी देखील अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.


एमबीएसाठी शेवटची प्रवेश पात्रता परीक्षा
सावर्डे ः विद्यार्थ्यांना यावर्षी एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना कोणतीही एक सीईटी प्रवेश पात्रता परीक्षा देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सीईटी झाली असून आता एटीएमए ही एकमेव सीईटी शिल्लक असून २८ मे रोजी होणाऱ्या या सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी २० मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. यासाठी www.atmaaims.com या संकेतस्थळावर माहिती प्राप्त होईल. सीईटी दिल्याशिवाय एमबीएसाठी पात्र होता येत नाही. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री एमबीएतर्फे मोफत मार्गदर्शन व फॉर्म भरून देण्यात येत आहे. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी व कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी महाडिक यांनी केले आहे.