चोरी प्रकरणी एकाला 2 वर्षे सश्रम कारावास

चोरी प्रकरणी एकाला 2 वर्षे सश्रम कारावास

३७ (पान ३ साठी)

चोरीप्रकरणी एकास दोन वर्षे कारावास

नाईक हायस्कूलमधील प्रकार ; दोघे निर्दोष, एकाची बंधपत्रावर मुक्तता

रत्नागिरी, ता. १६ ः चार वर्षांपूर्वी शहरातील धनजीनाका येथील नाईक हायस्कूलमधील अ‍ॅल्युमिनियमचे ग्रील वाकवून सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरी प्रकरणी एकाला दोन वर्ष सश्रम कारावास आणि १५०० रुपये दंड तो न भरल्यास १५ दिवसाची साधी कैद. तर दुसऱ्याला एक वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर १० हजार रुपयांच्या बंधपत्रावर मुक्त करण्यात आले. अन्य दोघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

अकिब जिक्रिया वस्ता (२२, रा. राजिवडा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. एकाची बंधपत्रावर मुक्तता करण्यात आली असून या दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. संशयिताविरुद्ध फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार १२ जून सायंकाळी साडेपाच ते १५ जून २०१८ दुपारी तीन वाजता या कालावधीत संशयितांनी एम. एस. नाईक हायस्कूलच्या इमारतीचे अ‍ॅल्युमिनियम ग्रील वाकवून प्रोजेक्टर, बोर्ड, माऊस, बुलेट कॅमेरा आदी १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. हा प्रकार शाळेतील सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी संशयितांना १८ जून २०१८ अटक केली होती. शहर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. विद्यानंद जोग यांनी, तर मदतनीस म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com