
ःरत्नागिरीचे समीर इंदुलकर सहकार्यवाहपदी
३२(पान २ साठी)
-rat१६p२०.jpg-
23M03250
मुंबई ः नाट्य परिषदेच्या निवडणुकीत सहकार्यवाहीपदी निवडून आलेल्या समीर इंदुलकर यांना शुभेच्छा देताना उद्योगमंत्री उदय सामंत.
-----
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या
रत्नागिरीचे समीर इंदुलकर सहकार्यवाहपदी
रत्नागिरी, ता. १६ ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांची निवड झाली, तर येथील रंगकर्मी समीर इंदुलकर यांची सहकार्यवाहपदी निवड झाली. येथील रंगकर्मीकडून समीर इंदुलकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
नाट्य परिषद अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरस होती. परिषदेच्या राज्यभरातील ६० सदस्यांनी यासाठी मतदान केले होते. नाट्य परिषदेचे अध्यक्षपद प्रशांत दामले यांना मिळाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात झाली होती. या निवडणुकीत प्रसाद मच्छिंद्र कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चुरस रंगली. अखेर या निवडणुकीत दामले यांच्या ‘रंगकर्मी समुहा’चे दहा उमेदवार निवडून आले, तर प्रसाद कांबळी यांच्या पॅनेलचे चार उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले. प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समुहाचे कार्यरत नाट्य परिषद कार्यकारिणीवर रंगकर्मी पॅनलचा झेंडा फडकल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरूनाथ दळवी यांनी दिली.
सहकार्यवाहपदी - समीर इंदुलकर, दिलीप पोरके आणि सुनील ढगे यांची निवड झाली. कार्यकारिणीमध्ये अकरा सदस्य निवडून आले आहेत. त्यात संजय देसाई, सविता मालपेकर, दीपक रेगे, सुशांत शेलार, विशाल शिंगाडे, विजय साळुंके, विजय चौगुले, गिरीश महाजन, संजय राहते, दीपा क्षीरसागर, संदीप पाटील यांचा समावेश आहे.
-----
नाट्य परिषदेला नवी दिशा
मागील पाच वर्षे नियामक मंडळाचा सदस्य होतो. मात्र कोविडमुळे काम करता आले नाही. मात्र निवनिर्वाचित अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांच्यासोबत सर्व नियामक मंडळ सदस्य नाट्य परिषदेला नवी दिशा देतील याची खात्री असल्याचे नवनिर्वाचित नाट्य परिषदेच्या सहकार्यवाह समीर इंदुलकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले.