वेंगुर्लेत कांदळवनाची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत कांदळवनाची 
विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
वेंगुर्लेत कांदळवनाची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

वेंगुर्लेत कांदळवनाची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

sakal_logo
By

03248
वेंगुर्ले ः कांदळवनाच्या स्वच्छतेनंतर कचरा एकत्र करण्यात आला.

वेंगुर्लेत कांदळवनाची
विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
वेंगुर्ले ः ‘जी २०’ अंतर्गत उर्जास्रोताचे संवर्धन व पर्यावरणपूरक जीवनशैली या कार्यक्रमानिमित्त येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या सुमारे ६० विद्यार्थी व प्राध्यापकांसह स्वामिनी बचतगटाच्या सदस्यांनी मांडवी खाडी येथे कांदळवनाची स्वच्छता केली. विद्यार्थी व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती व्हावी, यासाठी महाविद्यालयात प्रा. राजाराम चौगुले यांचे व्याख्यान झाले. सूर्य हा उर्जेचा स्रोत असून सोलार पॅनेल वापरून सोलार उर्जेचे रुपांतर इलेक्ट्रीसिटीत केले जाते. सूर्य आपल्याला एक हजार पटीने जादा उर्जा देतो. त्याचा वापर होणे गरजेचे असल्याचे यावेळी प्रा. चौगुले यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, प्रा. डॉ. आनंद बांदेकर, प्रा. वामन गावडे, डॉ. वसंतराव पाटोळे, प्रा. देविदास आरोलकर, डॉ. मनीषा मुजुमदार, प्रा. मारुती नवत्रे, प्रा. लक्ष्मण नैताम, प्रा. वैदही सावंत आदी होते.