आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी सडुरेवासीयांचे आज उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी 
सडुरेवासीयांचे आज उपोषण
आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी सडुरेवासीयांचे आज उपोषण

आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी सडुरेवासीयांचे आज उपोषण

sakal_logo
By

आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी
सडुरेवासीयांचे आज उपोषण
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १६ ः विनामोबदला दिलेल्या जागेत दहा वर्षांनंतरही अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिलेली नाही. इमारतीअभावी इतर सोयी सुविधा देखील सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे या केंद्रांत विविध सेवा सुविधा सुरू व्हाव्यात, याकरिता सडुरेचे माजी सरपंच विजय रावराणे यांच्यासह या परिसरातील विविध सरपंच आणि ग्रामस्थ उद्या (ता. १६) येथील तालुका आरोग्य कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
आरोग्य विभागाला दिलेल्या निवेदनात रावराणे यांनी म्हटले आहे की, सडुरे येथील मुकुंद सावंत यांनी आपल्या मालकीची ९२ गुंठे जमीन विनामोबदला सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीकरिता २०१३ मध्ये जिल्हा परिषदेला बक्षिसपत्राने दिली; मात्र दहा वर्षे उलटूनही या जमिनीत आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिलेली नाही. इमारतीअभावी अनेक सुविधा आरोग्य विभागाने येथे सुरू केलेल्या नाहीत. त्याचा मोठा फटका या भागातील रुग्णांना बसत आहे. सध्या एका छोट्याशा जागेत हे केंद्र सुरू आहे. या आरोग्य केंद्रांत नावळे, अरुळे, निमअरुळे, सडुरे-शिराळे आणि कुर्ली या गावांतील रुग्ण येतात. त्यामुळे या ठिकाणी इमारत उभी करावी आणि आरोग्यासाठी आवश्यक सर्व सेवासुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी रावराणेंसह इतर ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत; परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने उद्या येथील तालुका आरोग्य कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणास बसणार आहेत.