मासेमारी बंदी

मासेमारी बंदी

सागरी मासेमारीवर
१ जूनपासून बंदी
ओरोस, ता. १६ ः जिल्ह्यातील सागरी मासेमारीला १ जून ते ३१ जुलै अशी ६१ दिवसांची बंदी घालण्यात आली. मासळी साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण यासाठी ही बंदी असल्याची माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. स. अलगिरी यांनी दिली.
महाराष्ट्र सागरी मासेवारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत राज्याच्या जलधी क्षेत्रात (१२ सागरी मैलपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांसाठी ही बंदी आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन लवकर होत असल्याने तेथील किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १५ एप्रिल ते १४ जूनपर्यंत बंदी घोषित केल्याचे केंद्र सरकारने कळविले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन व रचना केलेल्या सल्लागार समितीशी संवाद साधून राज्याच्या जलधी क्षेत्रात बंदी कालावधीचे नियमन केले. मात्र, आदेशान्वये परवानाधारक बिगर-यंत्रचालित नौकांना मासेमारीची मुभा आहे.

हे आहेत निर्बंध...
पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू
पारंपरिक मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकाबंदीतून वगळल्या
समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित नौका १ जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक
अशा नौकांना ३१ जुलैपूर्वी समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही

या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्त हानी टाळता येणेही शक्य होते.
- श्री. स. अलगिरी, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com