कनकनगर रस्त्याचे डांबरीकरण

कनकनगर रस्त्याचे डांबरीकरण

कनकनगर रस्त्याचे डांबरीकरण
कणकवली ः शहरातील कनकनगर येथील अंर्तगत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. नरडवे - कणकवली या मुख्य रस्त्याला जोडणारे हे रस्ते खड्डेमय झाले होते. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायतीला रस्ते दुरूस्तीची मागणी केली होती. त्यामुळे कनकनगर गल्ली क्र. एक आणि दोन या परिसरातील जोडरस्ते विकासकाम नगरपंचायतीने हाती घेतल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
------------
कणकवलीत डांसाचा प्रादुर्भाव वाढला
कणकवली ः शहरातील काही भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरपंचयात प्रशासनाने डांस प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही उष्णा कायम आहे. परिणामी रहिवाशांना आपल्या घरातील खिडकी खुली करावी लागत आहे; पण, डांसाच्या प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी खिडक्या खुल्या करून ठेवने त्रासदायक ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com