कोंडयेत आजपासून जयंती उत्सव

कोंडयेत आजपासून जयंती उत्सव

कोंडयेत आजपासून जयंती उत्सव

विविध कार्यक्रम; बौद्ध ऐक्यवर्धक मंडळाचा उपक्रम

कुडाळ, ता. १७ ः बौद्ध ऐक्यवर्धक मंडळ (मुंबई), कोंड्ये यांच्या विद्यमाने विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव १९ व २० मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, कोंडये-बौद्धवाडी येथे आयोजित केला आहे.
शुक्रवारी (ता.१९) सकाळी साडेनऊला आरोग्य चिकित्सा शिबिर व मोफत औषध पुरवठा होणार आहे. यात मुंबई येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप कदम, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. कदम व जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर असणार आहेत. शिबिरात नेत्रतपासणी, औषधोपचार व गरजूंना चष्मे वाटप होईल. शिबिराचे उद्‍घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी अडीचला दिवसरात्र अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन माजी सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी (ता.२०) सकाळी आठला पंचशील ध्वजवंदन व पूजापाठ (बौद्धाचार्य डी. के. जाधव), साडेआठला रक्तदान शिबिर, दुपारी स्नेहभोजन, सायंकाळी चारला महिला मेळावा व फनी गेम्स, रात्री स्नेहभोजन, नऊला अभिवादन सभा व सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी सभाध्यक्ष अशोक तांबे, सरपंच ऋतुराज तेंडुलकर, उपसरपंच रवींद्र तेली, पोलिसपाटील संदेश मेस्त्री आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री साडेदहाला जिल्हास्तरीय वैयक्तिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान व मोठा गटात होणार आहे. लहान गटासाठी ३०००, २५००, २००० रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह, मोठ्या गटासाठी ५०००, ४०००, ३५०० व प्रत्येकी सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्य़ात येणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अशोक तांबे, सचिव किशोर तांबे, उपाध्यक्ष आनंद तांबे, कार्यकारिणी सदस्य विद्याधर तांबे, मनोहर तांबे, सत्यवान तांबे, धर्मपाल तांबे, सुनील तांबे, विनया तांबे, लवेश तांबे, सिध्दार्थ तांबे, शशिकांत तांबे, सचिन तांबे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com