बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजिक्स असोसिएशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजिक्स असोसिएशन
बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजिक्स असोसिएशन

बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजिक्स असोसिएशन

sakal_logo
By

२१ (टूडे ४ साठी)

बॉडी बिल्डिंग असोसिएशन
अध्यक्षपदी संदीप नाचणकर
रत्नागिरी, ता. १७ ः रत्नागिरी जिल्ह्यातील जीम मालकांच्या अडचणी आणि समस्यांवर एकत्र येऊन उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जीममालकांनी एकत्र येऊन बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी डिस्ट्रिक्टची स्थापना केली असून, या असोसिएशनची नोंदणी करण्यात आली. नोंदणी झाल्यानंतर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप उर्फ बावा नाचणकर यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी चिपळूणचे इरफ़ान काद्री आणि लांजाचे अभिजित वाघधरे यांची निवड करण्यात आली आहे.
नव्याने निवडलेली कार्यकारिणी अशी ः संदीप कृष्णा नाचणकर (अध्यक्ष), इरफान सय्यद इब्राहीम काद्री (उपाध्यक्ष, चिपळूण), अभिजित सुरेश वाघधरे (उपाध्यक्ष, लांजा), वैभव काशिनाथ कांबळे (सचिव, रत्नागिरी), भूषण सुधीर शिंदे (खजिनदार, चिपळूण), अमोल दिनेश जाधव (सहसचिव, रत्नागिरी), महेश मनोहर वादक (सहखजिनदार, दापोली), शशिकांत धोंडीराम भुरण (चिपळूण), आकाश मोहन पाटील (चिपळूण), सुरज रमेश पाटणे (खेड), प्रशांत महेंद्र सावंत (खेड), राज दिलीप कारेकर (खेड), सदानंद दिलीप बारटक्के (दापोली), उदय संभाजी ओतारी (चिपळूण), दुष्यंत संदेश पाथरे (राजापूर), दशरथ दाजी सापटे (मंडणगड), प्रणिता शिवाजी घाडगे (चिपळूण), हेमंत शांताराम जाधव (रत्नागिरी), नीता संजय वारेकर (मुंबई) यांचा सदस्य म्हणून कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.