चिपळूण ः बुद्ध भीमगीतांचा पिलवलीत आज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः बुद्ध भीमगीतांचा पिलवलीत आज कार्यक्रम
चिपळूण ः बुद्ध भीमगीतांचा पिलवलीत आज कार्यक्रम

चिपळूण ः बुद्ध भीमगीतांचा पिलवलीत आज कार्यक्रम

sakal_logo
By

बुद्ध भीमगीतांचा पिलवलीत आज कार्यक्रम
चिपळूण, ता. १७ः तालुक्यातील पिलवली येथील बौद्ध प्रगती मंडळाच्यावतीने तथागत् भगवान गौतम बुद्ध यांचा २५६६ वा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती महोत्सव गुरूवारी (ता. १८) सायंकाळी ५ वा. श्रावस्ती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी संदर्भ वाचनालयाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. या वाचनालयात आंबेडकरी चळवळीशी संबंधित अनेक प्रकारचे संदर्भ साहित्य असेल. अभिवादन सभेनंतर बुद्ध भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सायं. ७ वा. होणार आहे. या कार्यक्रमाला दलित पँथरचे सहसंस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र पवार, पत्रकार संदेश पवार उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरदास पवार तर स्वागताध्यक्ष रवींद्र पवार हे भूषवणार आहेत. या वेळी दलित पँथर या संघटनेचे सहसंस्थापक व ज्येष्ठ साहित्य ज. वी. पवार, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती मुंबई मुख्य कमिटीचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार, पत्रकार तथा तालुका शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संदेश पवार, पिलवली बौद्धजन प्रगती मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंत पवार, सत्यशोधक शिवप्रवर्तक समितीचे सचिव संदीप येलवे हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून पिलवली गावच्या सरपंच रेणुका आगरे, उपसरपंच महेश वाकडे, ग्रामसेविका साधना शेजवळ, माजी सरपंच वैशाली सावंत, पोलिस पाटील संजय सावंत, पिलवली गावाचे अध्यक्ष बाजीराव सावंत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.